आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

येरवडा कारागृहात इस्त्री व लॉन्ड्री विभागाचे उ‌द्घाटन

Spread the love

पुणे : येरवडा कारागृह येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी सोयीसुविधांनी सुसज्ज इस्त्री व लॉन्ड्री विभागाचे उद्घाटन सुनिल एन. ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे यांच्या हस्ते व अनिल खामकर, अधीक्षक, येरवडा खुले कारागृह, पी. पी. कदम, अति. अधीक्षक, येरवडा कारागृह यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सदर उपक्रम प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संकल्पनेतून स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी सुनिल एन. ढमाळ, अधीक्षक, पी. पी. कदम, अति. अधीक्षक, डॉ. बी. एन. ढोले, उपअधीक्षक, आर. ई. गायकवाड, उपअधीक्षक, एम. एच. जगताप, उपअधीक्षक, आनंदा एस. कांदे, वरीष्ठ तुरुंग अधिकारी, सुपमा चव्हाण, कारखाना व्यवस्थापक, बी. एम. शिंदे, तुरुंग अधिकारी व सर्व तांत्रिक संवर्गीय कर्मचारी यांनी काम पाहिले.