आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकास अटक

Spread the love

पुणे : रात्रीच्या वेळी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण २१ ऑक्टोबर २०२४ रोजी आंबेजोगाई येथून पुण्यात आला होता. मध्यरात्री दीडच्या सुमारास ते रिक्षात बसले. प्यासा हॉटेल ते सेव्हन लव्ह चौक दरम्यान, रिक्षा चालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून मारहाण केली.

खिशातील पाचशे रुपये आणि मोबाईल काढून घेतले आणि त्याला रस्त्यावर सोडून पळून गेले. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परतेने तपास करून रिक्षा चालक शहामुद्दीन निजामुद्दीन मुल्ला (वय २४, रा. बिबवेवाडी) आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तपास करीत आहेत.