आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नव राजस्थान सोसायटीतून चंदनाची झाडे चोरीस

Spread the love

पुणे : पुणे शहराच्या गजबजलेल्या परिसरातील एका सोसायटीतून चंदनाची झाडे चोरीस गेली आहेत. या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० आणि २१ ऑक्टोबरच्या रात्री घडली. प्लॉट क्र. १२, नव राजस्थान सोसायटी, एस. बी. रोड, पुणे आणि प्लॉट क्र. ०८, नीलकमल, विश्रामबाग सहकारी गृहनिर्माण सोसायटी, एस. बी. रोड, येथे फिर्यादींची ६०,०००/- रुपयांची दोन चंदनाची झाडे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कापून चोरून नेली.