आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारून ठार मारण्याचा प्रयत्न

Spread the love

पुणे : किरकोळ वादातून आणि जुन्या भांडणातून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात इंदिरानगर, बिबवेवाडी येथील तरुणाने फिर्याद दिली आहे. २० ऑक्टोबरच्या रात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादी तरुण त्याच्या मित्रासह बालाजीनगरकडे जाणाऱ्या पुलाच्या विरुद्ध बाजूच्या गल्लीत, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी येथे, सार्वजनिक रस्त्यावर गप्पा मारत उभे होते.

तेव्हा चार जणांचे टोळके तेथे आले. पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी फिर्यादीवर सिमेंटचा ब्लॉक मारून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारल्यामुळे गंभीर दुखापत झाली, आणि ते पळून गेले. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.