खराडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा खराडी पोलिसांनी पर्दाफाश केला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २.२५ लाख रुपयांचे १४ मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजचा एक तरुण १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत न्यू इंग्लिश फिनिक्स स्कूलच्या समोरील मैदानात, खराडी, पुणे येथे इव्हेंट (शो) पाहण्यासाठी गेला होता.
तसेच त्या इव्हेंटला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी जमली होती. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत फिर्यादीच्या खिशातील मोबाईल फोन आणि इव्हेंटसाठी जमलेल्या इतर प्रेक्षकांचे मोबाईलही चोरले. चंदननगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास खराडी पोलिस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक राहुल कोळपे आणि त्यांचे सहकारी करत होते. फोनचा शोध घेत असताना, शेखर शिंदे, अमोल जाधव, आणि श्रीकांत कोद्रे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संशयित आरोपी स्विट इंडिया चौक, खराडी, पुणे येथे आहेत.
मिळालेल्या माहितीवरून तपास पथकाचे अधिकारी पो.उ.नि. राहुल कोळपे, पोलीस हवालदार महेश नाणेकर, अमंलदार सचिन पाटील, प्रफुल्ल मोरे, अमोल जाधव, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सूरज जाधव या पथकाने कारवाई केली.
तिथे संशयित आरोपी (१) अखिल व्यंकटरमण गोदावरी (वय २४, रा. फलकनामा, रंगारेड्डी जिल्हा, हैद्राबाद), (२) सय्यद महमद इद्रीस शेख (वय २१, रा. मिलनसार सोसायटी, १२ बिल्डिंग जवळ, एस.आर.ए., पॅरेमान खार रोड, मुंबई), (३) लोकेश हनुमंत पुजारी (वय ३१, रा. घोरपडी गाव, बी.टी. कवडे रोड, शिवदत्त कॉलनी, पुणे) आणि (४) पप्पू भागीरथी वैश्य (वय ३४, रा. शांतीलाल कंपाऊंड, जवाहरनगर, खार ईस्ट, मुंबई) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे एकूण २.३० लाख रुपयांचे १४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
इव्हेंट आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून खराडी पोलिसांनी या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, तपास पथक प्रभारी अधिकारी पोउनि राहुल कोळपे, आणि पोलिस अंमलदार महेश नाणेकर, सचिन पाटील, प्रफुल मोरे, अमोल जाधव, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सूरज जाधव यांनी केली आहे.
