आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तीनशे दीव्यांग विद्यार्थ्याना दिवाळीचा फराळ वाटप

Spread the love

पुणे : महावीर फूड बँक व ऋषी आनंदवन सातव वाडी यांच्यातर्फेदरवर्षीप्रमाणे यंदाही ३०० विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त मिठाई वाटप समाजभुषण प्रमिलाबाई नौपतलालजी सांकला यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे सोनल तुपे, मनिषा चोरबेले, पुष्पा कटारिया, मानसी देशपांडे, वंदना भिमाले, हेमा गादिया, लता पगारिया, पायल धारवा, संगीता छाजेड अनिता खाबीया, नेतल चुत्तर, अलका यादव, मनिषा फाटे, स्वाती चिटणीस उपस्थित होत्या.

दिव्यांग कल्याणकारी केंद्र शिवरकर रोड, जांभुळकर चौक वानवडी-कोंढवा,येथे हा शुक्रवारी (दि. २५ ऑक्टोबर) कार्यक्रम झाला. एक चिवडा दोन लाडू दिव्यांगाशी नाते जोडू या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अशोककुमार पगारिया, अध्यक्ष विजयकुमार मरलेचा सर्व सदस्य महावीर फुड बँक, प्रमोद छाजेड-कार्याध्यक्ष व सर्व सदस्य ऋषी आनंद वन सातववाडी-हडपसर यांनी केले.