आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खडकीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

Spread the love

पुणे : खडकी बाजारपेठेत कपडे खरेदीसाठी आलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास खडकी बिझनेस सेंटर येथील प्रकाश क्लॉथ सेंटर, खडकी बाजार येथे ही घटना घडली.

फिर्यादी महिला कपडे खरेदी करण्यासाठी गेल्या असता, दुकानाच्या पायऱ्या उतरतानाच दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील ४,००,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जोरात हिसका देवुन पळुन घेवुन गेले. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरू करीत आहेत.