आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ऑनलाइन ट्रेडिंगच्या बहाण्याने २१ लाखांची फसवणूक

Spread the love

पुणे : ऑनलाइन ट्रेडिंगच्या बहाण्याने २१ लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार मुळा रोड, खडकी येथे घडला आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाशी एका व्यक्तीने ४ एप्रिल ते ११ मे या कालावधीत मोबाईलवर संपर्क साधला. फिर्यादीचा विश्वास संपादन करून, त्याला ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

त्यानंतर काहीही परतावा न देता, २१,००,०००/- रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले करत आहेत.