आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बाणेरमधील दुकान फोडून २२ हजारांची चोरी

Spread the love

पुणे : बाणेर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळच्या शिंदे सरकार बिल्डिंगमधील एका दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी २२ हजार रुपये लंपास केले.

या प्रकरणी एका महिलेने (वय ३६, रा. बालेवाडी फाटा, बाणेर) पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी ४ ते ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. फिर्यादी आणि त्यांच्या शेजारील दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी २२,०००/- रुपये रोख चोरी करून नेले. हा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके करीत आहेत.