आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पर्वती मतदारसंघात कर्णबधिर मतदारांसाठी स्वयंसेवकांचे प्रशिक्षण

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Social News, News, News Slider, Social • November 18, 2024
Spread the love

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कर्णबधिर मतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देणे, मतदारांशी संपर्क साधणे, त्यांना मतदानासाठी मदत करणे इत्यादी कामांसाठी नियुक्त केलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली.

या प्रशिक्षणासाठी शाहू कॉलेज व अनंतराव पवार इंजिनिअरिंग कॉलेजच्या एनएसएसचे विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पर्यवेक्षक रूपाली बलसाने, अरुण गोलाईत, शाहू कॉलेजच्या राणी शितोळे, भाऊसाहेब जाधव आदी उपस्थित होते.

कर्णबधिर मतदारांसाठी दुभाषक म्हणून कसे काम करायचे याचे प्रशिक्षण इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कर्णबधिर शाळेतील विशेष शिक्षिका मनीषा वैद्य यांनी दिले. कर्णबधिर व्यक्तींशी संपर्क साधणे, मतदानासाठी आवश्यक असलेली ओळखपत्रे कोणती आहेत हे सांकेतिक भाषेत सांगून त्याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींनी मतदानाची शपथ घेतली. भारतीय सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीताने प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता झाली.