आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

२६/११ मध्ये शहीद झालेल्यांना रक्तदान करून श्रद्धांजली

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), News, News Slider, Police, Social • November 26, 2024
Spread the love

सोलापूर : २६/११ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्याकरिता सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर येथे सिध्देश्वर ब्लड बँक यांच्या सहकार्यातुन रक्तदान करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. सदर रक्तदानासाठी मोठा प्रतिसाद मिळाला. एकूण ४० जणांनी रक्तदान करून शहिदांना अभिवादन केले. तसेच यावेळी सोलापुर शहराचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) यशवंत गवारी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान करून शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली.