आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), News, News Slider, Other, People, Police • December 16, 2024
Spread the love

याबाबत चंदननगर पोलिसांनी एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. हा प्रकार फिर्यादीच्या घराजवळ सप्टेंबर २०२२ ते ७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी १४ वर्षाची आहे. त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या मुलाने तिच्यावर प्रेम आहे, असे सांगून तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशी वारंवार शारीरीक संबंध ठेवले.

मुलीला मासिक पाळी येत नसल्याने आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. तपासणीमध्ये ती ७ महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. हे समजल्यानंतर आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत