आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डोक्यात सिलेंडर घालून मजुराचा खून

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), News, News Slider, Other, People, Police • December 16, 2024
Spread the love

पुणे – दारू पिताना झालेल्या वादातून एका मजुराचा डोक्यात सिलेंडर घालून खून करण्यात आला. आळंदीतील काळेवाडी येथे घडलेल्या या घटनेत दिघी पोलिसांनी गणेश खंदारे (वय २३) याला अटक केली आहे.

संतोष शंकर खंदारे (वय ४५, रा. काळेवाडी, धाकट्या पादुका मंदिराजवळ, आळंदी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
शनिवारी सायंकाळी सात वाजता ते रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली.

संतोष आणि गणेश हे दोघेही मजूर असून, संतोषच्या घरी दारू पिताना त्यांच्या दरम्यान वाद झाला. वाद तीव्र झाल्यानंतर गणेश खंदारे याने रागाच्या भरात घरातील सिलेंडर संतोषच्या डोक्यात घातला.

यात संतोष गंभीर जखमी होऊन कोसळला. सकाळी संतोषचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. फिर्यादीनुसार, रात्री संतोष व गणेश दारू पित असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी तपास करून गणेश खंदारे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दारूच्या आहारी जाऊन वादातून घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दिघी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.