आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे स्वारगेट चौकाला कोंडीचे ग्रहण

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Social News, MNN - Sport News, News, News Slider, Police, Social • December 27, 2024
Spread the love

पुणे : शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या स्वारगेट चौकातून दररोज लाखो वाहनांची ये-जा होते. परंतु रिक्षाचालकांची बेशिस्त, खासगी ट्रॅव्हल्सची अडथळा निर्माण करणारी गर्दी, तसेच सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, कात्रज रस्ता, हडपसर रस्ता आणि सिंहगड रस्ता या महत्त्वाच्या मार्गांच्या मध्यभागी असलेल्या या चौकातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. जवळच व्यापारी पेठा, प्रशासकीय इमारती, स्वारगेट बसस्थानक आणि शैक्षणिक संस्था असल्याने नागरिकांची वर्दळही मोठ्या प्रमाणावर असते.

बसस्थानकात जागेची कमतरता आणि बेशिस्त बसचालकांमुळे बसस्थानकाबाहेर लांब रांगा लागतात. त्यामुळे रस्ते अडवले जातात. तसेच रिक्षाचालक व खासगी ट्रॅव्हल्स भर चौकात वाहने उभी करून वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरतात. मेट्रोच्या कामामुळे बॅरिकेट्स उभारल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना या ठिकाणी कसरत करावी लागत आहे.

कोंडीची कारणे :

– खासगी ट्रॅव्हल्स आणि रिक्षांची बेशिस्त उभारी
बसस्थानक व्यवस्थापनातील त्रुटी
वाढती खासगी वाहनांची संख्या
पोलीस वाहतूक नियोजनातील अपयश
मेट्रोचे अद्याप सुरू असलेले काम