भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र डिजिटल न्यूजचे संपादक विजय कोरे यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी पब्लिक रिलेशन ऑफिसर प्रा. अनिल मुंढे यांनी विजय कोरे यांचा सत्कार केला
त्याचप्रमाणे, जिजाऊ टाइम्सच्या संपादिका संगीता पवार यांची समितीच्या बार्शी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या पत्रकारितेतील योगदान आणि समाजसेवेतील कार्याची दखल घेऊन ही निवड झाल्याचे समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
भ्रष्टाचार निर्मूलन समिती ही समाजातील गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराविरोधात कार्यरत आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे समितीच्या कार्याला अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याने प्रा. अनिल मुंढे यांनी विजय कोरे यांचा सत्कार केला. या निवडीमुळे दोन्ही पदाधिकारी समितीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योगदान देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे
