मायबोली परिवारातील सदस्यांचे गुणदर्शन आणि गुणवंतांचा सत्कार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मायबोली सांस्कृतिक मंडळाच्या वतीने नुकतेच परिवार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात सदस्यांनी विविध गुणदर्शन केले आणि परिवारातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली आणि मायबोलीचे संस्थापक स्वर्गीय विजूभाई माढेकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. मंडळाचे सचिव डॉ. प्रशांत मोहिरे यांनी स्वागतपर भाषण केले, तर अध्यक्ष मुकुंदराज कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून मायबोलीच्या आगामी कार्यक्रमांची रूपरेषा मांडली.
यानंतर, मंडळाचे देणगीदार डॉ. शिरीष भुमकर आणि ॲड. शांतीलाल मुनोत यांचा तसेच मायबोलीला मोलाचे सहकार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. विविध गुणदर्शन कार्यक्रमात मनवा पुजारी (गणेश वंदना) आणि ईशा गद्रे (देवी स्तवन) या चिमुकल्यांपासून सुरुवात झाली.
त्यानंतर वर्षा रसाळ (लग जा गले), माणिक कुलकर्णी (एक धागा सुखाचा), स्वाती डोळे (रिमझिम गिरे सावन), अनुराधा देशमुख (हिरकणी), दिलीप कल्याणी (शब्द पल्लवी), अविनाश आणि सुजाता हिंगमिरे (तुझे जीवन की डोर से), उमा विभुते, चंदा निमकर, शानू वायकर आणि वंदना कुलकर्णी (भारूड), सात्विक अंधारे आणि कृष्णा चिकणे (नृत्य)
अर्चना पोळ (काव्यवाचन), डॉ. हेमंत साने (यमन रंग), शोभा शेटे (कथाकथन), विजया बंग (तू कितनी अच्छी है), प्रशांत माळवदे (ओ मेरे दिल के चैन), सुनील फल्ले (सारा जमाना), गिरीजा पौळ (वारा गाई गाणे), बालकिसन जाजू (बोल राधा बोल), निलेश घाटे (पराधीन आहे जगती), मधुसूदन चांडक (छू ले दो नाजूक होटोको), शुभांगी काळे (रूक जा रात)
सूर्यकांत वायकर (ये रेशमी जुल्फे), ज्ञानेश निर्मळे (काव्यवाचन), वंदना देवणे (जिंदगी प्यार का गीत), दीपक जोशी (समा है सुहाना), संगीता केसकर (गीत), गुरुदत्त कुलकर्णी (किसी राह में) अशा विविध वयोगटातील कलाकारांनी उत्साहाने सादरीकरण केले.
कार्यक्रमादरम्यान, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मायबोली परिवारातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष व्यंकटेश कुलकर्णी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सफाईदार सूत्रसंचालन डॉ. वैशाली मोहिरे आणि पल्लवी माढेकर यांनी केले. लकी ड्रॉ आणि अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
या प्रसंगी व्यासपीठावर उपाध्यक्ष जवाहर माढेकर, अरुण शहा, सुनील आबा पाटील, जितेंद्र माढेकर, अमिता कुलकर्णी, राजेंद्र श्रीश्रीमाळ, निलेश माढेकर आदी संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रणाली शेटे, तृप्ती माढेकर, सुमन चंद्रशेखर, प्रमोदिनी कोठारी, दिनकर सापनाईकर या कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.
