महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे – हाइड पार्क सोसायटीतील ‘ओल्ड इज गोल्ड’ ग्रुपकडून जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दररोज सकाळी नियमित योग व प्राणायाम करणाऱ्या या ग्रुपच्या सुमारे ५० ज्येष्ठ सदस्यांनी आज विशेष योग सत्रात सहभाग घेतला.
या कार्यक्रमात सूर्यनमस्कार, विविध आसने, प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश होता. सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक उर्जेचा अनुभव घेतला आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. ज्येष्ठ नागरिकांनी नियमित योगामुळे मिळणाऱ्या फायद्यांविषयी अनुभव कथन करत उपस्थितांना प्रेरणा दिली.
‘ओल्ड इज गोल्ड’ ग्रुपकडून अशा आरोग्यवर्धक उपक्रमांचे आयोजन पुढेही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले
