आवृत्ती पुणे
← Back to Homepage

राहुल मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • March 10, 2026
Spread the love

पुणे : R-Isha Securetech Pvt. Ltd. चे राहुल मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त “Your Health, Our Priority” या संकल्पनेतून ९ मार्च रोजी कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अंबिके क्लब हाऊस, इलेक्ट्रॉनिक को-ऑप. इस्टेट, मुख्य गेटजवळ, पुणे-सातारा रोड, पर्वती येथे हे शिबिर उत्साहात पार पडले.

या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये कंपनीच्या पुणे, नाशिक आणि कोल्हापूर शाखांतील एकूण १०८ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. कर्मचार्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या उद्देशाने जनरल चेकअप, डोळ्यांची तपासणी, कान-नाक-घसा (ENT) तपासणी, दंत तपासणी तसेच रक्त तपासणी अशा विविध तपासण्यांचा समावेश करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजेश सांकला उपस्थित होते. तसेच Ruby Hall Clinic, Pune येथील Gastrointestinal, Obesity व Hernia Surgeon डॉ. केदार पाटील यांनी विशेष मार्गदर्शन करत पचनाचे विकार, हर्निया आणि स्थूलता या विषयांवर उपयुक्त माहिती दिली.

या शिबिराचे समन्वयक म्हणून डॉ. मैत्री शीतल ओसवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून आपली सेवा दिली. त्यामध्ये ENT तपासणी डॉ. प्रणिता बाउसकर कसाट, जनरल तपासणी डॉ. उज्वला शिंदे, डोळ्यांची तपासणी सूर्या ऑप्टिशियन तसेच दंत तपासणी डॉ. प्रीती ओसवाल यांनी केली.

या उपक्रमाला कंपनीचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मचार्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढावी, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश असल्याचे राहुल मुथा यांनी यावेळी सांगितले.

याच प्रसंगी राहुल मुथा यांनी “गौतमनिधी फाउंडेशन”च्या माध्यमातून दोन विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षाच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारल्याची घोषणाही केली.

← Back to Homepage

राहुल मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त R-Isha Premier League चे भव्य आयोजन

Spread the love

पुणे : R-Isha Securetech Pvt Ltd च्या संपूर्ण परिवारासाठी 9 मार्च 2025 हा दिवस अत्यंत खास ठरला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य IPL चे आयोजन सोनाली मुथा यांनी केले.

या अनोख्या स्पर्धेचे नियोजन अत्यंत कौशल्यपूर्वक करण्यात आले होते. यामध्ये सुरुवातीला रोमहर्षक लिलाव प्रक्रिया पार पडली, जिथे प्रत्येक ब्रँडने आपल्या संघाचे संघटक निवडले. सहभागी कंपन्यांमध्ये Hikvision, Prama, Matrix, ESSL, Netgear, Western Digital, Voltaic, Honeywell आणि Ravel यांचा समावेश होता. या स्पर्धेतील संघांना महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची नावे देण्यात आली, ज्यामुळे स्पर्धेला एक वेगळेच वैभव प्राप्त झाले.

यामध्ये Matrix कंपनीने ट्रॉफी स्पॉन्सर म्हणून विशेष भूमिका बजावली, ज्यामुळे स्पर्धेतील स्पर्धात्मकतेला आणखी उंची प्राप्त झाली. स्पर्धेच्या संपूर्ण दिवसभरात आनंद, हशा आणि जल्लोषाचे वातावरण होते. सहभागी खेळाडूंसाठी स्वादिष्ट जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धेतील सामन्यांमधील चुरस आणि उत्कंठा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी होती.

संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक संघाने तीन सामने खेळले. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी पार पडली. अंतिम फेरीत खेळाडूंच्या कौशल्याची खरी कसोटी लागलेली. जे सहभागी होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी ही स्पर्धा कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आली. त्यामुळे चाहत्यांना आपल्या आवडत्या संघांचे आणि खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी मिळाली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी R-Isha Securetech Pvt Ltd च्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली. कंपनीच्या टीमने घेतलेला पुढाकार आणि सर्वांच्या सहकार्यातून हा दिवस संस्मरणीय ठरला. श्री. राहुल मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मैत्रीची भावना वृद्धिंगत झाली आणि त्यांची संघभावना अधिक दृढ झाली.

या भव्य आयोजनासाठी सहभागी कंपन्या, खेळाडू आणि आयोजन समितीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. “त्याच दिवशी भारताच्या संघानेही विजय मिळवला, त्यामुळे हा दिवस आणखी खास ठरला.” 9 मार्च 2025 हा दिवस R-Isha Securetech Pvt Ltd साठी केवळ एक स्पर्धा नव्हता, तर तो एक अविस्मरणीय सोहळा ठरला!

संघ आणि त्यांची नावे
Hikvision – लोहगड
Prama – तोरणा
Western Digital – प्रतापगड
Netgear – रायगड
ESSL – राजगड
Voltaic – शिवनेरी
Ravel – सिंधुदुर्ग
Honeywell – सिंहगड

विजयी संघांचे नावे
विजेता संघ: Hikvision – लोहगड
उपविजेता संघ: Voltaic – शिवनेरी
सर्वोत्कृष्ट खेळाडू (Man of the Series): दिनेश वर्खडे
सामनावीर (Man of the Match): दिनेश जगताप
सर्वोत्कृष्ट गोलंदाज (Best Bowler): सूरज जोशी

get_footer();