आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दुगड ग्रुप आयोजित रक्तदान व महिला आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • March 10, 2026

पुणे : दुगड ग्रुपतर्फे कै. हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिर तसेच जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला आरोग्य तपासणी शिबिर रविवारी (दि. ८ मार्च) पुष्पा हाइट्स, बिबवेवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदाते आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या शिबिराचे उद्घाटन जैन श्रावक संघाच्या महासतिजी तसेच जैन सोशल इंटरनॅशनल फेडरेशनचे चेअरमन बिरेंद्र शहा व जैन सोशल महाराष्ट्र फेडरेशनचे चेअरमन दिलीप मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. दुगड ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सुमारे ९६० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले, अशी माहिती दुगड ग्रुपच्या वतीने ॲड. रवींद्र दुगड यांनी दिली.

या रक्तदान सोहळ्यास खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, बाबाशेठ मिसाळ, शहर सुधार समिती अध्यक्षा स्मिताताई वस्ते तसेच पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्यासह अनेक नवनिर्वाचित नगरसेवकांची उपस्थिती लाभली.

याशिवाय अभय छाजेड, ॲड. एस. के. जैन, रविंद्र सांकला, इंद्रजित जैन, राजेश सांकला, अजय मेहता, दिनेश ओसवाल, मनोज छाजेड, ललित शिंगवी, सुनील नहार, अनिल नहार, अनिल भन्साळी, पोपटलाल ओस्तवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरामध्ये पुना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, महा ब्लड सेंटर कॅम्प, आधार ब्लड सेंटर, आचार्य आनंदऋषीजी ब्लड सेंटर आणि पीएसआय ब्लड सेंटर सह्याद्री या सहा रक्तपेढ्यांनी रक्तसंकलनात सहभाग घेतला. या उपक्रमासाठी गौतम नाबरिया यांचे विशेष सहकार्य लाभले.

तसेच महिला आरोग्य तपासणी शिबिरामध्ये हिमोग्लोबिन, रक्तातील साखर, हाडांची ठिसुळता, ओबेसिटी आणि दंतरोग यांसह सुमारे ३०० महिलांची तपासणी करण्यात आली. याशिवाय कर्करोगासंदर्भात २७० महिलांचे स्क्रिनिंग करण्यात आले.

यासाठी सिद्धार्थ हॉस्पिटलचे डॉ. विजय सेठिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले, तर कर्करोग स्क्रिनिंगसाठी डॉ. राहुल चोरडिया यांचे सहकार्य लाभले. शिबिराच्या ठिकाणी रक्तदाते व उपस्थितांसाठी नाश्ता आणि जेवणाची उत्तम व्यवस्था दुगड ग्रुपतर्फे करण्यात आली होती. एकंदर हा उपक्रम अत्यंत दिमाखात आणि यशस्वीपणे पार पडला.

या शिबिराच्या आयोजनात निर्जरा ग्रुप, जितो लेडीज विंग, जितो पुणे चॅप्टर, पुना सोनी समाज, स्वामिनी ग्रुप, ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स पंचम झोन, गौतमनिधी फाउंडेशन, युगल धर्म संघ, जैन सोशल ग्रुप, सहायता ग्रुप, एफटीएन फाउंडेशन, आनंद दर्शन युवा मंच, फिलंट्स कम्युनिटी सर्व्हिसेस, द सोशल युथ क्लब, आरजी हेल्पिंग हॅन्ड, आय सोशल क्लब, रोट्रॅक्ट रोटरी क्लब, आरंभ यात्रा संघ, गुड टाइम्स क्लब, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट, एलिमेंट्स ग्रुप, द होतेसम, बाउल फ्रेंड्स क्लब, गोविंदा ग्रुप, पंच परमेष्ठी प्रतिष्ठान, श्रीमंत सुवर्णवीर तरुण मित्र मंडळ (ट्रस्ट), कुमुद ग्रुप, उडान टीम पुणे, निओमेड कॅन्सर केअर, डायग्नोपेन डायग्नोस्टिक, फर्स्ट व्हिजन आणि लव्ह केअर शेअर फाउंडेशन आदी सामाजिक व वैद्यकीय संस्थांचा सहभाग लाभला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हेमंत रायसोनी, महेंद्र सुंदेचा मुथा, नरेंद्र बलदोटा, परेश बोरा, राहुल मुनोत, राहुल संचेती तसेच दुगड ग्रुपतर्फे प्रमोद दुगड, महेंद्र दुगड, प्रवीण दुगड, गौरव दुगड, ऋषभ दुगड, मनोज दुगड, संदीप दुगड आणि संपूर्ण दुगड कुटुंबाने विशेष परिश्रम घेतले.

get_footer();