आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नागपाडा येथे डायग्नोपिनच्या नव्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • April 27, 2026
Spread the love

पुणे: मुंबईतील नागपाडा परिसरात डायग्नोपिनच्या नव्या अत्याधुनिक शाखेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे (आयएएस), शिवसेना उपनेते विजय नहाटा, खासदार अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते या आधुनिक डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन पार पडले.

मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या या नव्या शाखेमुळे नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

येथे एमआरआय स्कॅन, सीटी स्कॅन, डेंटल केअर, सोनोग्राफी, विविध प्रकारच्या ब्लड टेस्ट, एक्स-रे, ईसीजी तसेच 2D इको यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा दरात या सेवा देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. एमआरआय तपासणीचे दर दिवसा 2500 रुपये तर रात्री 1900 रुपये ठेवण्यात आले आहेत.

डेंटल रूट कॅनल उपचार 1500 रुपयांपासून उपलब्ध असून, शुगर तपासणी केवळ 40 रुपयांपासून सुरू करण्यात आली आहे. या सेंटरमुळे मुंबईकरांना दर्जेदार, आधुनिक आणि किफायतशीर आरोग्यसेवा मिळणार असून, आरोग्य क्षेत्रात डायग्नोपिनने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी सतीश बनवट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल्ल कोठारी आणि मितेश कोठारी यांनी उपस्थित मान्यवर तसेच नागरिकांचे आभार मानले.

get_footer();