आवृत्ती पुणे

कल्याणीनगरमधील सहा लोखंडी पावसाळी चेंबरची चोरी

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कल्याणीनगरमधील सहा लोखंडी पावसाळी चेंबर अज्ञाताने चोरून नेली. पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. कल्याणीनगरमधील पुष्पक सोसायटीच्या लेनमध्ये २० ऑगस्ट २०२१ रोजी उघडकीस आला. वैभव कांबळे (वय ३४, रा. येरवडा, पुणे) … Read more

जन्मदात्या आईला मुलांकडून लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण

पुण्यात मायलेकरांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : पुण्यात मायलेकराच्या नात्याला काळिमा फासणारी हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. दोन नराधम मुलांनी वयोवृद्ध आईच्या नावावरील संपत्ती हडप करण्यासाठी जन्मदात्या आईचा अमानुष छळ केला आहे. त्या नराधम दोन तरुणांनी आपल्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तिला घराबाहेर काढलं आहे. याप्रकरणी पीडित आईने बंडगार्डन पोलीस … Read more

सुरेश पिंगळे आत्महत्याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे सुरेश पिंगळे यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्यावर पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, 80 टक्के भाजले असल्याने त्यांचा कालउपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनवण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. त्यांच्या कामासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यांनी … Read more

किरकोळ कारणावरून युवकास मारहाण

बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : टोळक्यातील सातपैकी तिघांना अटक महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : किरकोळ कारणावरून सात जणांच्या टोळक्याने एका युवकास मारहाण केल्याची घटना बुधवारी अप्पर भागात घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या अप्पर भागात छोट्या छोट्या कारणासाठीदेखील मारामारीच्या घटना घडत आहेत. असाच प्रकार बुधवारी रात्री दहाच्या … Read more

कोयता बाळगणाऱ्या आरोपीसह गंभीर गुन्ह्यातील दोघांना अटक

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कामगिरी : मोस्ट वाँटेड आरोपींना शिताफीने पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : बेकायदा लोखंडी कोयता बाळगणाऱ्या आरोपीसह गंभीर गुन्ह्यातील दोन मोस्ट वाँटेड आरोपींना अटक करण्यात पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला यश आले आहे. खंडणीविरोधी पथक एकचे सहायक पोलिस निरिक्षक बुवा, सहायक पोलिस फौजदार वांजळे, रमेश चौधर, दुर्योधन गुरव व … Read more

बोलेरो पिकअपचा पाठलाग करून तब्बल वीस लाखांचा गुटखा जप्त

विमानतळ पोलिसांची कामगिरी : चौघांपैकी दोन जण अटकेत महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : नगररोड परिसरात बेकायदा गुटखा वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपचा पाठलाग करून विमानतळ पोलिसांनी तब्बल वीस लाखांचा गुटखा जप्त केला असून, याप्रकरणी चौघांपैकी दोघांना अटक केली असून,आणखी दोघांचा शोध सुरू आहे. सोमवारी (16 ऑगस्ट) रात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत विमानतळ पोलिसांच्या तपासपथकातील पोलिस नाईक सुशील … Read more

गुन्ह्यातील जप्त पाच वाहनांचा शुक्रवारी होणार लिलाव

मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात कार्यवाही : चार ट्रक व एका टेंपोचा समावेश महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : गुन्ह्यात जप्त केलेली वाहने अनेक वर्षे मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. त्यातील चार ट्रक व एका टेंपोचा लिलाव करण्यासंबंधीची सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी पुणे यांच्या परवानगीने शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता मार्केटयार्ड … Read more

नाना गायकवाडसह साथिदारांविरुद्ध मोका

चतुरशिंगी पोलीस स्टेशन :पुणे शहरात मोठी खळबळ महाराष्ट्र ३६० न्युज पुणे : गेली अनेक वर्षे बेकायदा सावकारी करून दहशतीने घरजमीनी बळकावणार्या औंध येथील नानासाहेब गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड तर शिवाजीनगर येथील सोनाली दिपक गवारे, दिपक निवृत्ती गवारे, पिंपळे निलखचा राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ, विधाते वस्ती औंध येथील सचिन गोविंद … Read more

हनी ट्रॅपद्वारे व्यवसायीकाला लुटणारी टोळी गजाआड !

कोंढवा पोलीस स्टेशन : आयुक्तांनीही केले कौतुक महाराष्ट्र ३६० न्युज इंस्टाग्रामवर ओळख करून व जवळीक वाढवून तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते असे धमाकाऊन पैसे उकळणाऱ्या टोळीला कोंढवा पोलिसांनी गजाआड केले आहे.सोशल मिडीयाच्या विविध साईडवरून अशा प्रकारे नागरीकांना जाळ्यात ओढले जात आहे.या गोष्टीला पुढील काळात या कारवाईमुळे चाप बसणार आहे. कोंढवा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयातील … Read more

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये अनेक उपयोगी वस्तूचा जाहीर लिलाव ।

लष्कर पोलीस स्टेशन : कोर्टाच्या परवानगीने होणार लिलाव महाराष्ट्र 360 न्युज पुणे :लष्कर पोलीस स्टेशन येथे मागील अनेक दिवसापासून पडून असलेला जुना मुद्देमाल कोर्टाच्या परवानगीने पोलिसांनी लिलावात काढला आहे. यामध्ये जुने लॅपटॉप,कपडे,मोबाइल,कार टेप अशा अनेक वस्तू असणार आहेत.17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लष्कर पोलीस स्टेशनमध्ये हा लिलाव होणार आहे. यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो.न्यायालयाची … Read more