आवृत्ती पुणे

हडपसरमध्ये केळी खरेदी करताना ज्येष्ठ महिलेची मोहनमाळेची चोरी

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क हडपसर-मंत्री मार्केट येथे ज्येष्ठ महिला हातगाडीवर केळी खरेदी करीत होती, त्यावेळी अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मोहनमाळ व रोख दीड हजार रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. दि. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ६० वर्षीय ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध … Read more

2 मोबाईल, 3 सीमकार्ड जेलमध्ये पोहच कर’!

येरवडयातून ‘गँगस्टर’ सागर राजपूतची वसुलीसाठी राणी मारणेला सांकेतिक भाषेत चिठ्ठी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क उसन्या पैशांवर मनमानी व्याज आकारत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील आरोपीने त्याच्या बहिणीला सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहिली. ‘दोन सॅमसंग गुरूचे मोबाईल, एअरटेल, व्होडाफोन, आयडीयाचे प्रत्येकी एक सीम कारागृहात पोहच कर’, अशा सूचना तिला देण्यात आल्या असल्याचे पोलिस तपासात उघड झाले … Read more

सराईताकडून पन्नास हजारांच्या पिस्टलसह काडतूस जप्त

युनिट १ गुन्हे शाखा पुणेची कामगिरी : खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सराईताकडून पन्नास हजारांच्या पिस्टलसह काडतूस जप्त करण्यात युनिट १ गुन्हे शाखा पुणेला यश आले असून, खून, खुनाचा प्रयत्न, मारामारीचे तीन गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) युनिट १ गुन्हे शाखेचे … Read more

गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रोडवर आता दोन्ही बाजूंस ‘नो पार्किंग’

तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित : ४ सप्टेंबरपर्यंत मागवल्या सूचना महाराष्ट्र ३६० न्यूज स्वारगेट वाहतूक विभाग पुणे अंतर्गत, गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रोडवर आईमाता मंदिरापर्यंत दोन्ही बाजूंस नो पार्किंग करण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित करण्यात आला असून, याबाबत ४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत.

जन्मदात्या आईला मुलांकडून लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण

पुण्यात मायलेकरांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : पुण्यात मायलेकराच्या नात्याला काळिमा फासणारी हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. दोन नराधम मुलांनी वयोवृद्ध आईच्या नावावरील संपत्ती हडप करण्यासाठी जन्मदात्या आईचा अमानुष छळ केला आहे. त्या नराधम दोन तरुणांनी आपल्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तिला घराबाहेर काढलं आहे. याप्रकरणी पीडित आईने बंडगार्डन पोलीस … Read more

किरकोळ कारणावरून युवकास मारहाण

बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : टोळक्यातील सातपैकी तिघांना अटक महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : किरकोळ कारणावरून सात जणांच्या टोळक्याने एका युवकास मारहाण केल्याची घटना बुधवारी अप्पर भागात घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या अप्पर भागात छोट्या छोट्या कारणासाठीदेखील मारामारीच्या घटना घडत आहेत. असाच प्रकार बुधवारी रात्री दहाच्या … Read more

पेट्रोलपंपावर लुटणारे दोघे सराईत जेरबंद

विमानतळ पोलिसांची कामगिरी : साठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोहगाव येथील साठे पेट्रोल पंपावर आठवड्यापूर्वी मध्यरात्री कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने खिशातील १६,००० रुपये चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात विमानतळ पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून एकूण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.. लोहगाव येथील धानोरी रोड परिसरातील … Read more

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये अनेक उपयोगी वस्तूचा जाहीर लिलाव ।

लष्कर पोलीस स्टेशन : कोर्टाच्या परवानगीने होणार लिलाव महाराष्ट्र 360 न्युज पुणे :लष्कर पोलीस स्टेशन येथे मागील अनेक दिवसापासून पडून असलेला जुना मुद्देमाल कोर्टाच्या परवानगीने पोलिसांनी लिलावात काढला आहे. यामध्ये जुने लॅपटॉप,कपडे,मोबाइल,कार टेप अशा अनेक वस्तू असणार आहेत.17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लष्कर पोलीस स्टेशनमध्ये हा लिलाव होणार आहे. यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो.न्यायालयाची … Read more

धक्का मारून मोबाईलची चोरी

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : माळवाडी रोडवर मोपेडस्वारांचे कृत्य पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज धक्का मारून १२,००० रुपये किमतीचा मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी दोघा अज्ञात मोपेडस्वारांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. या प्रकरणी रंजित म्हात्रे (वय २५, रा. हडपसर पुणे) यांनी मोपेड गाडीवरील अनोळखी दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दि. … Read more