आवृत्ती पुणे

तरवडेवस्ती येथे रिक्षाच्या धडकेत एकाचा मृत्यू

वानवडी पोलिसांत गुन्हा : मद्यपान करून चालवित होता रिक्षा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घोरपडी बाजार येथील आर्मी पब्लिक स्कूल शेजारील रोडवर पॅगो रिक्षाची धडक बसून एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १ नोव्हेंबर २०२१) दुपारी पावणेचारच्या सुमारास आर्मी पब्लिक स्कूलशेजारील रोडवर घोरपडी बाजार येथे घडली. सुनील शंकर बेंगळे (वय ५५, रा. वेदांत … Read more

सराईत वाहनचोर जेरबंद

मार्केटयार्ड पोलिसांची कामगिरी : चोरीच्या सहा टूव्हीलर हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत वाहनचोरास जेरबंद करण्यात मार्केटयार्ड पोलिसांना यश मिळाले असून, याप्रकरणी चोरीच्या सहा टूव्हीलर हस्तगत करण्यात आल्या आहेत.मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक कदम, पोलीस हवालदार हिरवाळे, पोलीस नाईक किरण जाधव, पोलीस शिपाई अनिस शेख, कदम असे वरिष्ठ … Read more

पोलीस दलातील वीरमरण आलेल्यांच्या स्मृतीला पोलीस दलाने वाहिली आदरांजली

पोलीस दलातील वीरमरण आलेल्यांच्या स्मृतीला पोलीस दलाने वाहिली आदरांजली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यासह देशभरामध्ये मागिल वर्षामध्ये पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. त्यांच्या स्मृतीला आज (गुरुवार, दि. २१ ऑक्टोबर) पोलीस स्मृतिदिनी पोलीस दलाच्या वतीने पाषाण येथील सीआरपी येथील पोलीस हुतात्मा स्मृतिस्थळावर आदरांजली वाहण्यात आली. पुण्यातील महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र येथे पोलीस … Read more

दीड वर्षाची चिमुकली पालकांच्या स्वाधीन

ताडीवाला रोड पोलिसांची कामगिरी : पालकांना दक्षतेचे आवाहन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सापडलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात ताडीवाला रोड पोलिसांना यश मिळाले असून, पालकांना आपल्या पाल्याकडे निक्षून लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून रिक्षामध्ये हरवलेल्या दीड वर्षाच्या मुलीच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात सुखरूप दिले. पालकांनी लहान मुलांकडे लक्ष … Read more

पालिकेच्या कचरा गाडीला धडकल्याने स्विफ्ट कारचा अपघात

कारचालकाचा मृत्यू : मुंढवा-घोरपडी रस्त्यावर शुक्रवारी पहाटे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महानगरपालिकेचा कचरा सफाई करणारा ट्रक रस्त्याच्या कडेची सफाई करत असताना भरधाव वेगातील स्विफ्ट कार पाठीमागून धडकून अपघात झाला. या अपघातामध्ये कारचालकाचा मृत्यू झाला. मुंढवा-घोरपडी रस्त्यावरील कचरे वस्ती सुभाष घई बंगल्याजवळ शुक्रवारी (दि.8) पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. प्रशांत जगन्नाथ … Read more

बंगला बांधून देण्याच्या आमिषाने पावणे दोन कोटीची फसवणूक

वानवडी पोलीस स्टेशनमध्ये महिलेसह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंगलो प्लॉटवर बंगला बांधून देण्याच्या आमिषाने एकाची 1 कोटी 65 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात एका महिलेसह चौघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पेश अरविंदभाई पटेल, अरविंदभाई लालजीभाई पटेल, सुधाबेन अरविंद पटेल आणी हेलत अल्पेश पटेल(सर्व रा.मगरपट्टा, हडपसर) … Read more

मांजा गळ्याला अडकल्याने मोटारसायकलस्वार जखमी

अज्ञाताविरुद्ध गु्न्हा : मुंबई -पुणे महामार्गावरील सीएमई गेटसमोर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई -पुणे महामार्गावरील दापोडी येथील सीएमई (CME) गेटसमोरुन मोटारसायकलस्वार जात असताना त्याच्या गळ्यात पतंगीचा मांजा अडकून जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मांजामुळे गळा कापला जाऊन शहरात काही जणांचा मृत्यु झाला आहे.त्यामुळे सर्वत्र चायनीज मांजावर बंदी घालण्यात आली आहे. … Read more

गांजा बाळगल्या प्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळल्या

अर्धा किलो गांजा जप्त : म्हातोबानगर वाकड येथे पोलिसांची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गांजा बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 527 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 5) दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास म्हातोबानगर वाकड येथे करण्यात आली. पूनितकुमार विवेक … Read more

पोलीस भरती परीक्षेला बसणाऱ्या दोन तोतया परीक्षार्थी जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स, आंबेगाव बुद्रुकमधील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस भरती परीक्षेसाठीचे हॉल तिकीट, पॅनकार्ड व फोटो असे कागदपत्र दाखवत बसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जेरबंद केले. ही घटना सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स, आंबेगाव बुद्रुक येथे घडली. बाबासाहेब भीमराव गवळी (वय २२), सूरज केसर सिंग भोपळावत (वय … Read more

तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यासह खासगी व्यक्तीवर गुन्हा

लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई : 70 हजार रुपयांची केली होती मागणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीच्या सपाटीकरणासाठी तहसीलदार यांची परवानगी मिळवून देण्यासाठी खासगी व्यक्ती संजय महादेव जाधव (वय-28) याने तक्रारदार यांच्याकडे 70 हजाराची लाच मागितली. तर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून बालाजी सुधाकर चिद्दरवार (वय-50) याने लाचेची रक्कम स्विकरण्यास प्रोत्साहन दिले. याप्रकरणी … Read more