आवृत्ती पुणे

अनधिकृत पुतळा बसविणाऱ्याकडून पोलीसांना धक्काबुक्की

येरड्यातील सेवालाल चौकातील प्रकार : सार्वजनिक जागेवर परवानगीशिवाय बसविला पुतळा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : येरवड्यातील सेवालाल चौकात महापुरूषांचा अनधिकृतरित्या पुतळा बांधकामकरून उभा केल्यानंतर तो काढून टाकण्यास सांगण्यास गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह पोलीसांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सनी चव्हाण (26 ), राहुल चव्हाण (29 ), आकाश चव्हाण (45 … Read more

कर्वेनगरमध्ये मारहाण करणारे चौघे जेरबंद, एक फरार

वारजेमाळवाडी पोलिसांत गुन्हा : ओळख करून देतो म्हणाल्याने घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माझ्याशी कशाला ओळख करून देतो, असे का म्हणला म्हणून चिडून तलवारी, लोखंडी रॉड, बांबूने घराच्या गेटवर मारून खिडक्यांच्या काचा फोडत, कुंड्या फेकून देऊन मोटारसायकलचे नुकसान करणाऱ्या चौघांना अटक केली असून, एकजण फरार झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २४ … Read more

पार्किंगमधून मोपेड काढून देण्याच्या बहाण्याने सोन्याची बांगडी चोरली

शनि मंदिराजवळ घडली घटना : विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तिघा अज्ञातावर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पार्किंगमधून मोपेड काढून देण्याच्या बहाण्याने तिघांनी एक लाख पाच हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना शनि मंदिराच्या बाजूला निरामय मेडिकलसमोरील पार्किंगमध्ये घडली. विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी … Read more

अवघ्या दहा मिनिटात पावणे दोन लाखांची चोरी

वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजातून घरातील एक लाख 76 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी राजवाडेनगर, काळेवाडी येथे घडली. हा प्रकार केवळ दहा मिनिटात घडला आहे. वरूण पिल्ले (वय 28, रा. राजवाडेनगर, काळेवाडी) यांनी वाकड … Read more

नऊ महिन्यांनी पुन्हा ३ गुन्ह्यात सापडला साथीदारासह जेल

पिंपरी-चिंचवडमधील युनिट-४ची कारवाई : येरवडा कारागृहातून कारकुनाच्या नजरचुकीने सुटला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा कारागृहात वाहन चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला एक आरोपी कारागृहातील कारकुनाच्या नजरचुकीमुळे सुटला. मात्र, त्याने गुन्ह्यांचे सत्र सुरूच ठेवले. शेवटी नऊ महिन्यांनी पोलिसांनी पुन्हा त्याला तीन गुन्ह्यात अटक करून त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. संतोष उर्फ बबलू धनसरे (वय … Read more

कोरोना टेस्ट किटचे दोघे बनावट वितरक जेरबंद

पुणे शहर सायबर पोलीस स्टेशनची कामगिरी : गुजरातमध्ये जाऊन घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : करोना या वैश्विक महामारीचे काळात कोव्हीसेल्फ या कोरोना टेस्ट किटचे कायदेशीर वितरक असल्याचा बनाव करून फसवणूक करणाऱ्या दोन इसमांना जामनगर, गुजरात येथून अटक करण्यात पुणे शहर सायबर पोलिसांना यश मिळाले असून, बहुसंख्य लोकांच्या संभाव्य होणाऱ्या फसवणुकीस आळा बसला … Read more

महिला पोलिसांना आता आठ तासांची ड्युटी

27 सप्टेंबरपासून अंमलबजावणी : चार तासांचा कपात झाल्याने निर्णयाचे स्वागत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील महिला पोलिसांना आठ तासांची ड्युटी देण्याबाबत सरकारने आदेश काढला असून पुणे पोलिस दलातील महिला अंमलदारांबाबत या निर्णयाची २७ सप्टेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. ड्युटीमध्ये चार तासांचा कपात झाल्याने महिला … Read more

लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊनच्या सहकार्याने सोलापूर रोड येथील लसीकरण शिबिर संपन्न

३६० नागरिकांचा सहभाग : आरोग्यसेविका आणि आशाताई यांना भेटवस्तूंचे वाटप महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शहरातील लिओ क्लब बार्शी टाऊन यांच्या सहकार्याने सोलापूर रोड भागात घेण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने सुमारे ३६० जणांना लस देण्यात आली. या वेळी क्लबच्या वतीने आरोग्यसेविका व आशाताई यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचे … Read more

सात महिन्यांपासून महिलेशी अश्लिल चाळे करणारा मॅनेजर जेरबंद

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार : मंतरवाडीतील गोडाऊनमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गोडावूनमध्ये काम करणार्‍या महिला कामगाराशी कामाचे निमित्त करुन जवळीक साधून गेली ७ महिने तो अश्लिल आणि नको ते चाळे करायचा. त्याच्या या वर्तनामुळे त्रासलेल्या महिलेने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. लोणी काळभोर पोलिसांनी या मॅनेजरला अटक केली आहे. मंगेश बादोले (वय … Read more

मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील एकास अटक

सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : एकूण पावणेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील एकास अटक करण्यात सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून, विविध कंपन्याचे २२ महागडे मोबाईल व बुलेट मोटारसायकल असा ३,८२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात मोबाईल स्नॅचिंग … Read more