वारजेमाळवाडी पोलिसांत गुन्हा : ओळख करून देतो म्हणाल्याने घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : माझ्याशी कशाला ओळख करून देतो, असे का म्हणला म्हणून चिडून तलवारी, लोखंडी रॉड, बांबूने घराच्या गेटवर मारून खिडक्यांच्या काचा फोडत, कुंड्या फेकून देऊन मोटारसायकलचे नुकसान करणाऱ्या चौघांना अटक केली असून, एकजण फरार झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २४ सप्टेंबर) रात्री एकच्या सुमारास कर्वेनगर येथे घडली.
सचिन शिंदे (वय ३२, रा. सरगम सोसा. कर्वेनगर, पुणे), नितीन जमादार (वय ३२, रा. रत्नदीप सोसायटी, कर्वेनगर, पुणे), अमित प्रसाद (वय ३२, रा. कर्वेनगर, पुणे), रोहित काळे (वय २७, रा. औदुंबर कॉलनी, वारजे) असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे असून, एकजण फरार आहे. याप्रकरणी विठ्ठल कुरपे (वय ४७, रा. कर्वेनगर, पुणे यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचे ट्रिकट शॉटचे दुकान आहे. फिर्यादीला दुकानात बोलावून दोघांची ओळख करून देत होते. माझ्याशी कशाला ओळख करून देतो, असे म्हणाल्याने चिडून जाऊन हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, बांबू घेऊन फिर्यादीच्या घरावर, गेटवर मारून खिडक्यांच्या काचा व कुंड्या फोडल्या, मोटारसायकलची हेडलाईटची काच फोडून नुकसान करीत जीवे मारहण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली.
पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक होळकर करीत आहेत.