पुणे शहर सायबर पोलीस स्टेशनची कामगिरी : गुजरातमध्ये जाऊन घेतले ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : करोना या वैश्विक महामारीचे काळात कोव्हीसेल्फ या कोरोना टेस्ट किटचे कायदेशीर वितरक असल्याचा बनाव करून फसवणूक करणाऱ्या दोन इसमांना जामनगर, गुजरात येथून अटक करण्यात पुणे शहर सायबर पोलिसांना यश मिळाले असून, बहुसंख्य लोकांच्या संभाव्य होणाऱ्या फसवणुकीस आळा बसला आहे.
सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहरकडील नमुद गुन्ह्यातील फिर्यादी चेतन सोनराज रावळ यांची मे. लॅब डिस्कवरी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीतर्फे Coviself COVID 19 Rapid Antigen Self Test Kit हे कोवीड माय चाचणी करण्याचे टेस्टिंग किट (उपकरण) बनविले आहे. सदरच्या उपकरणाचे मॅनिफॅक्चरिंग व डिस्ट्रीब्युशन त्यांच्याच कंपनीकडून चालते. गुन्ह्यातील आरोपीतांनी फिर्यादीच्या कंपनीच्या नामसाधर्म्याचा वापर करून त्या सारखे नवीन mylabsales.com हे डोमेन व फिर्यादी याचे नावे एक ईमेल आयडी तसेच फिर्यादीचे व फर्मचे नाव त्यांचा लोगो वापरून हुबेहुब बनावट सेल्स ऑर्डर बनवून त्यांची प्रोडक्टसच्या ऑर्डर्स घेण्यासाठी त्यांचा दिल्लीतील साथीदार व पाहिजे आरोपी भावेश पासवान याचे करवी कमिशनपोटी पासवान इंपोर्ट एक्सपोर्ट प्रा. लि. नावाचे बनावट फेसबुक पेज बनवून फिर्यादीचे मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स प्रायव्हेट लि. कंपनीतील कोव्हीसेल्फ हे कोव्हीड चाचणी किट हे प्रोडक्ट विकण्याचे डिस्ट्रीब्यूटर असल्याचे भासवून त्यांच्याकडील इमेल्स, बँक खाती, फोन नंबर्सद्वारे लोकांची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास करताना आरोपीतांनी डोमेन बनविताना तसेच गुन्ह्यात वापलेले बँक खात्याची माहिती प्राप्त केली असता, सदर आरोपीतांचा पत्ता हा जामनगर, गुजरात येथील निघाला. त्याप्रमाणे पोलीस पथक हे जामनगर, गुजरात येथे पाठविले असता सदर गुन्ह्यात आरोपी संस्कार संस्कृत / तनय कुमार सिंग (वय १९, रा. डिगजाम मिलजवळ, जामनगर, गुजरात) आणि प्रशांत सिंग /गुड्डू (वय २४, रा. जामनगर, गुजरात) यांचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाल्याने सदर आरोपीतांना २१ सप्टेंबर रोजी रात्रौ अकरा वाजता राहात्या घरातून अटक करण्यात आली.
सदर आरोपीतांनी सदरचा गुन्हा हा पाहिजे आरोपीताच्या सांगण्यावरून केला असल्याची माहिती दिली असून, सदर आरोपीताचा तपास सुरू आहे. अटक आरोपीतांना २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.
सदर कारवाईद्वारे सायबर पोलिसांनी करोना या वैश्विक महामारीचे काळात Coviself COVID 19 Rapid Antigen Self Test Kit हे कोवीड चाचणी करण्याचे टेस्टिंग किटची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने सदर किटचे अधिकृत विक्रेते असल्याचे भासवून जनतेची फसवणूक करणाऱ्या आरोपीतांस अटक करून अशा प्रकारे बहुसंख्य लोकांची संभाव्य होणाऱ्या फसवणुकीस आळा घातला आहे.
सदरची कारवाई ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक चिंतामण, हवालदार संदेश कर्णे, पोलीस नाईक जाबा, अंमलदार नवनाथ जाधव, अनिल पुंडलीक, नितीन चांदणे या पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.