सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरव : मुंबईत पुरस्काराचे वितरण संपन्न
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र खेल पुरस्कार समितीच्या वतीने बार्शीचे विकास माने (कर्तव्य पुरस्कार), पवन श्रीश्रीमाळ (सामाजिक सेवा) श्रीशा येडलवार व साक्षी थोरात ( क्रिडा विभाग स्केटिंग प्रकार) यांना खेल पुरस्कार २०२१ ने सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला माने, श्रीश्रीमाळ, येडलवार व थोरात यांच्या रूपाने बार्शीचा मुंबईत सन्मान झाला.
सदर पुरस्काराचे वितरण मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण तथा क्रीडा अधिकारी राजेश कंकाळ, बॉडी बिल्डर मिस्टर इंडिया मनिष अडविलकर, महाराष्ट्र खेल पुरस्कार समितीचे आयोजक विशाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र खेल पुरस्कार समितीचे अध्यक्ष राज कपूर बागडी, उपाध्यक्ष प्रियंका येडलवार उपस्थित होते .
पुरस्काराचे मानकरी ठरलेले विकास काशीनाथ माने हे बार्शी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी असून सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच संवेदनशीलता जपत मार्गदर्शन व मदत करतात,आपल्या कर्तव्यात सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याला वचनबध्द मानून सेवा बजावतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला
पवन संजय श्रीश्रीमाळ हे बार्शी शहरातील विविध संघटनेमध्ये कार्यरत आहेत, निर्भया महिला सुरक्षा पोलीस पथक उपविभाग बार्शी यामध्ये अशासकीय प्रतिनिधी म्हणून गेली २ वर्ष काम पाहिले आहे, लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊनचे अध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत, त्याच प्रकारे दुष्काळी काळामध्ये जैन समाजाच्या वतीने 128 गावांना मोफत पाणी पुरवठा टँकरने करणे, भाकड जनावरे व कत्तलखान्यातील पकडलेली जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतलेली जनावरे जैन सेवा तीर्थ गोरक्षण मध्ये संभाळणे विविध रक्तदान शिबिर घेणे कोरोनाच्या काळात पोलिसांसोबत कोविड वॉरियर्स म्हणून काम पहिले आहे.
श्रीशा जितेश येडलवार – सलग ७ वर्ष RSFI च्या जिल्हासतरीय स्पीड स्केटिंग मधे सुवर्ण पदक पटकवले आहे तसेच सोलापूर जिल्हा व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत RGOI च्या राष्ट्रीय स्तरावर २ कांस्य पदक पटकाविले तिला अत्ता पर्यंत २० सवर्ण, १२ रोप्य , ७ कांस्य असे ३९ पदक मिळवले आहेत.
साक्षी गणेश थोरात बार्शी शहरातील 12 व्या वर्गात आहे .तिने SGFI, RSFI, CBSE च्या वतीने सोलापूर, नागपूर व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर करत तिने 15 सवर्ण , 9 रोप्य व 4 कांस्य मेडल असे 28 मेडलस जिंकले आहेत.
