टेंभुर्णी पोलीसांची कामगीरी : २४ तासाच्या आत कोयता गँगचे आरोपी केले गजाआड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वानवडी पोलीस स्टेशन पुणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड यांचेवर धारदार हत्याराने हल्ला करणारे आरोपी हे पुणे येथुन खाजगी वहानांने सोलापुर कडे पळून निघाले असल्याची माहिती सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळताच त्यांनी नाकाबंदीचे आदेश दिले व आरोपींना २४ तासाच्या आता टेंभुर्णी पोलीसांनी गजाआड केले.
याविषयी अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड यांचेवर धारदार हत्याराने हल्ला करणारे आरोपी हे पुणे येथुन खाजगी वाहनांने सोलापुर कडे निघाले आहेत अशी माहिती सोलापूर पोलीसांना मिळाली. पोलीसांनी तातडीने नाकाबंदी करणे बाबत सुचना दिल्या.
नाकाबंदीमध्ये या कोयता गँगच्या आरोपींना टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक लक्झरी बसमध्ये पकडण्यात आले. सोलापुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा अजित पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस स्टेशन कडील प्रभारी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, सहायक पोलीस निरीक्षक गिरीष जोग,
पोलीस उपनिरीक्षक, कुलदीप सोनटक्के, अजित मोरे, पोलीस हवालदार संदीप गिरमकर, विलास नलवडे, अशपाक शेख, कांतीलाल लाड, पोलीस नाईक प्रविण साठे, विनोद साठे, पोलीस कॉ. बाळराजे घाडगे, रशिद मुलाणी चालक नितीन डाकवाले असे टिम घेऊन पुणे ते सोलापुर हायवे रोडवरील वरखडे टोल नाका येथे तात्काळ “नाकाबंदी” करून पुणे बाजुकडुन सोलपुर कडे जाणारी प्रत्येक खाजगी वाहने चेक करून त्यामध्ये संशियत आरोपी सापडतात का याचा तपास करीत होते.
दरम्यान दिनांक २६ ऑगस्ट सोमवारी पहाटे ०२/०० वा सुमारास एक लक्झरी बस चेक करीत असताना त्यामध्ये पोलीस अधिका-यावर हल्ला करणारे संशीयत आरोपी बसल्याचे दिसुन आले. त्यावेळी टेंभुर्णी पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, पुणे शहर यांची टिम यांनी शिताफीने पकडुन ताब्यात घेतले.
त्याचे कडे विचारपुस करता त्यांनी त्यांची नांवे १) राहुलसिंग रविंद्र सिंग भोंड (वय २० रा. तुळजाभवानी वसाहत गाडीतळ पुणे), २) निहालसिंग मुन्नुसिंग टाक (वय १९) ३) अमरसिंग जग्गरसिंग टाक (वय २३ रा. इराणीवस्ती गल्ली नंबर ३ पाटील ईस्टेट शिवाजीनगर पुणे) असे नांव असल्याचे सांगितले.
सदर आरोपी बाबत पुणे काईम युनिट ५ पुणे यांचेशी चर्चा केली असता यातील ताब्यात घेतलेले आरोपीवर वेगवेगळया प्रकारचे एकुण १७३ गुन्हे असुन सदरचे आरोपी हे “कोयता गॅग” मधील असल्याची माहीती समोर आली.
यातील आरोपी हे सतत धारदार कोयते, ब्लेड, पिस्टल, रिव्हालव्हर, कात्री असे हत्यार सोबत बाळगत असुन व यापुर्वी ही त्यांनी यापुर्वी पोलीसांवर दोन वेळा प्राणघातक हल्ला केला होता. अशा घातकी आरोपींना टेंभुर्णी पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी पकडुन पुणे शहर पोलीस यांचे ताब्यात दिले आहे.
रविवारी दुपारी वानवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षकावर हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर पोलीस आरोपींच्या मागावर होते. त्यांच्या वर वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पोलिसांनी राज्यभर अलर्ट दिला होता. पोलीसावरच जीवघेणा हल्ला झाल्यामुळे संपूर्ण राज्याची पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती.
पुण्याबाहेर जाणाऱ्या सर्वच मार्गावर पोलिसांची करडी नजर होती. टोल नाक्यावर पुण्याबाहेर जाणारे प्रत्येक वाहन तपासले जात होते. आरोपी सोलापूरच्या दिशेने निघाल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तातडीने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला सतर्क केले होते. कसल्याही परिस्थितीत हल्लेखोर आरोपी सुटता कामा नयेत, असा आदेश त्यांनी दिला होता.