वाहतूक पोलिसांची कार्यवाही : भारती विदयापीठ पोलीसांच्या ताब्यात दिला आरोपी
पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
भारती विद्यापीठ वाहतूक विभागातील कर्मचारी हे कात्रज चौकामध्ये वाहतूक नियमन करीत असताना कात्रज घाटाकडून येणारी होंडा सीटी गाडी त्यांनी तपासासाठी आडवली असता त्या गाडीमध्ये त्यांना अफू या अंमली पदार्थाची बोंडे व पाने आढळून आले.त्यांनी तातडीने ही माहिती कंट्रोलला कळऊन आरोपींना मुद्दे मालासह भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिले.
या विषयी अधिक माहिती अशी की, भारती विद्यापीठ वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी धनाजी वणवे व वाय.एन.मांढरे हे कात्रज चौकात ११ जानेवारी रोजी दुपारी ३ च्या दरम्यान वाहतूक नियोजन करीत असताना त्यांना कात्रज घाटाकडून येणारी डी.एल.४ सी ए.एच ६७२७ ही पाढर्या रंगाची होंडा सिटी कार दिसली. कारच्या चालकाने सीट बेल्ट लावलेला नसल्यामुळे या कर्मचार्यांनी गाडी थांबवण्यासाठी चालकाला हाथ केला.मात्र चालकाने गाडी न थांबवता गाडी देहूरोडच्या दिशेने पळवण्यास सुरुवात केली. या कर्मचार्यानी त्याचा पाठलाग करीत काही अंतरावर गाडी अडवली. गाडीची कागदपत्रे मागितली असता यातील चालक गणपत बिष्णोई वय ३०, राहणार फुरसुंगी मूळ गाव जोधपुर, राजस्थान याने उडवाउडविची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
या पोलीसांना त्याच्या बोलण्या वरून गाडीत काहीतरी आहे असा संशय आला असता त्यांनी गाडी चेक केली. गाडीच्या डिक्की मध्ये अफू या अंमली पदार्थाची बोंडे व पाने आढळून आले. या पोलिसांनी तातडीने ही माहिती कंट्रोलला कळवली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी येऊन आरोपीला ताब्यात घेतले.भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.