दत्तवाडी पोलीसांची कामगिरी
पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, एक इसम पिस्टल घेऊन बालशिवाजी चौकाजवळ, दत्तवाडी, पुणे येथे ओढ्यालगत उभा आहे. याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली.
दत्तवाडी पोलीस ठाणेचे तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील लोहार,पोलीस अंमलदार अक्षयकुमार वाबळे व कुंदन शिंदे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “एक इसम त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल असुन, तो ते पिस्टल सोबत घेऊन बालशिवाजी चौकाजवळ, दत्तवाडी, पुणे येथे ओढ्यालगत मोकळ्या जागेत एकटाच कोणाची तरी वाट बघत थांबला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी ही वरिष्ठ पोलीस निरिक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांना कळवून त्यांच्या आदेशाने पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील लोहार यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन स्टाफच्या मदतीने सापळा रचुन सदरच्या इसमास पकडले. त्याचे नाव गोपाळ उर्फ रोहितभाऊ बंडू गवळे (वय २२ वर्षे) धंदा इलेक्ट्रीशन रा.अप्पर गैस गोडाऊनजवळ, अप्पर इंदिरानगर, पुणे असे असुन त्याची झडती घेतल्यावर त्याच्या कमरेच्या डाव्या बाजुस आतमध्ये एक देशी बनावटीचे पीस्टल व पॅन्टच्या डाव्या खिशात एक जिवंत काडतूस होते. या सर्व वस्तू त्याच्याकडून हस्तगत करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी हा दत्तवाडी पोलीस ठाणेच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वी जाळपोळ, अग्निशास्त्रे जवळ बाळगणे अशाप्रकारचे गुन्हे दाखल असुन सदरचे पिस्टल त्याने जवळ बाळगण्याचा नक्की काय उद्देश होता याबाबत त्याच्याकडे तपास सुरु असुन पुढील तपास पो.हवालदार कुंदन शिंदे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग. मा. संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त सो परि. ३ मा.पौर्णिमा गायकवाड, सह.पोलीस आयुक्त सिंहगड विभाग पोमाजी राठोड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस
उप-निरीक्षक स्वप्नील लोहार, पो. हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, पो.अं. महेश गाढवे, अक्षयकुमार वाबळे, सागर सुतकर, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, प्रमोद भोसले व विष्णु सुतार हे करीत आहेत.