पथक २ ची कारवाई : ८ दुचाकी केल्या हस्तगत
पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२,गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोलीस आयुक्त यांच्या ऑलआऊट कारवाई अंतर्गत शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्या कडून ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
दिनांक ३०/१२/२०२० रोजी ऑलआऊट कारवाई अंतर्गत वाहन चोरीस आळा घालणेकरीता पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२,गुन्हे शाखा पुणे शहर यांनी व त्यांच्या पथकातील पोलीस अमलदार मनोज खरपुडे व पोलीस हवालदार दिपक लांडगे यांना मिळालेले बातमीवरुन दुचाकी वाहन चोरी करणारे इसम राम सिध्देश्वर यादव वय २९ वर्षे रा माळी मळा लोणीकाळभोर ता. हवेली जिल्हा पुणे व महावीर राम वाघमारे वय १९ वर्षे रा. सदर मुळगाव आरळी (खुर्द) ता नळदुर्ग जिल्हा उस्मानाबाद यांना हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सासवड रोडवरच्या कॅनॉल जवळ थांबून,सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्या कडे अधिक चौकशी तपास केला असता या आरोपींनी हडपसर, वाघोली-लोणीकंद, खडकी, उरुळी कांचन , लोणी काळभोर या भागातून दुचाकी वाहने चोरी केलेचे कबूल केले. त्यांच्याकडून बजाज पल्सर-१,होंडा शाईन ५, होंडा अॅक्टीवा २ अशा एकूण ३,२०,०००/- रुपयाची ८ दुचाकी वाहने जप्त केलेली असून त्यापैकी खडकी पोलीस स्टेशन कडील-१, हडपसर पोलीस स्टेशन कडील-१, व पुणे ग्रामीण चे लोणीकंद पो. स्टे. हददीतील कडील-३ दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. व इतर तीन वाहनांचे मालकांचा शोध चालू आहे.अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांनी महाराष्ट्र ३६० न्यूजशी बोलताना दिली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर बच्चन सिंग, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा-२, पुणे शहर लक्ष्मण बोराटे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२,गुन्हे शाखा सुनिल पंधरकर पुणे शहर यांच्या पथकाच्या पोलीस अमलदार सहाय्य्क पोलीस फौजदार तानाजी कांबळे, राजेश अभंगे, उदय काळभोर, राजेश लोखंडे, मनोज शिंदे, दिपक लांडगे, विनायक रामाणे, दिनकर लोखंडे ,मुकुंद पवार, मनोज खरपुडे, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव, अमोल सरतापे यांनी पार पाडली आहे.