खडक पोलीस स्टेशनची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना खडक पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुलासह १,१३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी शुभम शिंदे याचेजवळ एक गावठी पिस्टल असुन तो व त्याचा साथीदार सेव्हन लव्हज चौक पुणे या ठिकाणी थांबलेला आहे. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवली.
त्यांनी बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पो. उप- निरीक्षक प्रल्हाद डौगळे, पोलीस हवालदार हर्षल दुडम, ठवरे, पो. नि. नितीन जाधव, पो. नि ढायरे, पो. नि. चव्हाण आडबाजुस खाजगी वाहन पार्क करुन सापळा रचुन पाहणी केली.
तेथे शुभम शिंदे व त्याचा साथीदार हे सेव्हन लव्हज चौकाजवळ ब्रिजचे खाली शंकरशेठ रोड स्वारगेट पुणे या ठिकाणी उभे असलेले दिसले. त्यांची नजरानजर होताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानच त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले.
यावेळी शुभम अनिल शिंदे, (वय २४ वर्षे, रा. दुर्गा माता मंदिराजवळ महर्षीनगर पुणे), सिध्देश अशोक शिगयन (वय १९ वर्षे, रा. श्रीधर काळे सायकल मार्ट जवळ व्हेयीकल डेपो लगत गुलटेकडी पुणे) यांच्या कडून गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व त्याचे खिशात ०२ जिवंत राऊंड मिळून आले, तसेच सिध्देश अशोक शिगवन याच्या पॅन्टमध्ये बनावटीचे पिस्टल मॅगझीनराह व ०१ जिवंत राऊंड मिळून आले.
एकूण १,१३,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला. दोघानाही अटक करण्यात आली असून हा तपास सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे हे करीत आहे.
ही कारवाई खडक पोलीस स्टेशनचे शशीकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शर्मिला सुतार पोलीस निरीक्षक (गुन्हे). सहा. पो. निरी.. अनिल सुरवसे, पो. उप-निरी.. प्रल्हाद डोंगळे पोलीस उप-निरीक्षक, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, नितीन जाधव, लखन डावरे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, समीर भोरडे, भालचंद्र दिवटे, कृष्णा गायकवाड, मयूर काळे, संतोष बारगज, उमेश महपती, शेखर खराडे, यांचे पथकाने केली आहे.