आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महावीर शाळेतील खेळाडूंचा क्रीडा महोत्सव

Spread the love

पुणे: महावीर शाळेतील खेळाडूंचा क्रीडा महोत्सव हा महाराष्ट्र मंडळ चंद्रशेखर आगाशे कॉलेज ग्राउंड, गुलटेकडी येथे आनंदात पार पडला.

महावीर स्कूलचा “ॲन्युअल स्पोर्ट्स डे” महावीर स्कूल कमिटीचे ‘चेअरमन रायचंद कुंकूलोल, प्रेसिडेंट विजयकांत कोठारी, प्रिन्सिपल डॉ. पल्लवी सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोषात साजरा झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या “शिवछत्रपती अवॉर्ड हॉलीबॉलचे मानकरी ‘प्रियांका बोरा’ उपस्थित होत्या. यावेळी प्रियांका बोरा यांनी मुलांना खेळाविषयीच्या स्वतःच्या अनुभवातून सर्व संकटांवर मात करत कसे जिंकायचे आणि पुढे जायचे याचे मार्गदर्शन केले. तिसरी, चौथी, पाचवी च्या मुलांनी सुंदर ड्रिलचे सादरीकरण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सहावी ते दहावीच्या मुलींनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्री प्रायमरी पासून तर दहावीपर्यंतच्या मुलामुलींनी डॉजबॉल, बटरफ्लाय, रनिंग, रिले असे अनेक खेळांमध्ये भाग घेऊन खेळाचा आनंद लुटला. प्रमुख पाहुण्यांनी विजेता खेळाडूंना मेडल देऊन त्यांचे कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवला. प्रिन्सिपल डॉ.पल्लवी सोमण यांनी सर्व कार्यक्रमाचे क्रेडिट सर्व शाळेतील टीचर यांना देऊन सर्वांचे भरभरून कौतुक करुन सर्वांना प्रोत्साहन दिले. East and West Mahaveer is the best चा जयघोष करत कार्यक्रमाची सांगता झाली.