गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : शरद मोहोळ यांचा खून करणाऱ्या साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर सह, टोळी प्रमुख विठठल शेलार व त्याच्या १६ साथीदाराविरूध्द मोक्का अंतर्गत गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.
साहील ऊर्फ मुन्ना पोळेकर, (वय २०, रा. शिवशक्ती मित्रमंडळ शेजारी सुतारदरा कोथरुड), नामदेव कानगुडे (वय ३४, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा, कोथरुड), विठ्ठल गांडले (वय २०, शिवशक्तीनगर, सुतारदरा, कोथरुड), अमित कानगुडे, (वय २४ रा.लेन नं.९५, स्वराज मित्र मंडळ पर्वती), चंद्रकांत शेळके, (वय २२ रा. लेन नं.९४, जनता वसाहत, पर्वती), विनायक गव्हाणकर, (वय २०, रा. शंतनू कॉम्प्लेक्स, पौड रोड, मुळशी, जि. पुणे) रविंद्र पवार (वय ४०, रा.स.नं.३४, नांदे गाव, दत्ता राजे बंगला, ता. मुळशी, जि. पुणे), संजय उढाण, (वय ४३ रा. प्लॉट नंबर ८, संकल्प पारीजात, लेन नंबर ८, उजवी भुसारी, कोथरूड), सतीश शेडगे, (वय २८ वर्षे, रा. स्वप्नशिल्प अपार्ट माथवाडी फाटा, भुगाव, ता. मुळशी, जि. पुणे), धनु उर्फ धनंजय वाटकर( वय २५ वर्षे, रा. फिनीक्स स्काय बिल्डिंग, ओम कॉलनी, विदयानगर, सैदापुर कराड, ता.कराड, जि. सातारा), नितीन खैरे, (वय ३४ वर्षे, रा. सर्वे नं.८१/०६, नंदनवन सोसायटी, गादिया इस्टेट, कोथरूड), आदित्य गोळे, ( वय २४ वर्षे, रा. संत तुकाराम नगर, गोळे आळी, पिरंगुट, ता. मुळशी जि.पुणे), संतोष कुरपे (वय-४९ वर्षे, रा. रघुनंदन सोसायटी, कृष्णा कॉलनी परमहंस नगर, कोथरूड) रामदास उर्फ वाघ्या मारणे, ( वय ३६ वर्षे, रा. मु. आंबेगाव, पो. उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे) विठठल शेलार, (वय-३६ वर्षे, रा. मु. बोथरवाडी, पो. उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. तर प्रितसिंग (रा. उमरठी, राज्य मध्य प्रदेश), गणेश मारणे (रा. कर्वेनगर) या आरोपींचा शोध सुरू आहे.
शरद मोहोळ हे स्वतःच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने ते त्यांच्या सहका-यांसह त्यांच्या स्वतःच्या ओम साई केबल ऑफिस, सुतारदरा कोथरूड येथुन पायी जात होते. येवले चाळी जवळ पांडुरंग मंदिराशेजारी, सुतारदरा कोथरूड येथील सार्वजनिक रस्त्यावर आरोपी मुन्ना ऊर्फ साहील पोळेकर (रा. शिवशक्ती नगर, पडवळ बिल्डींग समोर, सुतारदरा, कोथरुड) व त्याच्या इतर दोन अनोळखी साथीदार यांनी शरद मोहोळ यांच्यावर पिस्तूलने फायरिंग करून त्यांना गोळ्या घालून जिवे ठार मारले होते. तसेच फायरिंग करून आरोपी पळून जात असताना त्यांचा पाठलाग करणारे प्रमोद साठे यांच्यावर देखील आरोपी मुन्ना पोळेकर याने फायरिंग करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबाबत फिर्यादी यांनी कोथरूड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयाच्या तपासादरम्यान पाहिजे आरोपी विठठल शेलार (टोळी प्रमुख) याने संघटीतपणे स्वतःच्या व टोळी सदस्य यांच्या आर्थिक फायदयासाठी वेगवेगळ्या सदस्याच्या टोळया चालविल्या. बेकायदेशीर मार्गाने आर्थिक लाभ घेत असुन त्याच्या विरुद्ध गंभीर स्वरुपाचे २१ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा त्याने पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१ सुनिल तांबे हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१ सुनिल तांबे यांच्या मागदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, पोलीस अंमलदार, सुनिल राऊत, शरद वाकसे, नितीन कांबळे, नितिन काळे, गणेश ढगे यांनी केली आहे. मोक्काअंतर्गत केलेली ही ११४ कारवाई आहे.
