महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त भुम येथील शंकरराव पाटील महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी एकूण ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये महाविद्यालयातील प्रा.विद्यार्थी, व कर्मचारी यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम दीप प्रज्वलन व श्रीफळ फोडून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. चंदनशिव यांनी केली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. एन. डी. पडवळ, प्रा. एन. आर. जगदाळे, प्रा. दीप्ती गिरी, व सर्व प्राध्यापक, कर्मचारी, रामभाई शहा, रक्तकेंद्र बार्शी येथील कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. टी. आर. बोराडे, प्रा. एस. एम. माळी, प्रा. मंगेश खराटे , प्रा. राहुल राठोड, प्रा. जयेश मसराम, प्रा. गोपाल खंदारे, प्रा. एल. बी. पवार, प्रा. नवनाथ भोंग, प्रा. आर. गायकवाड, एस. प्रा. अक्षय डोंगरदिवे, याशिवाय सर्व प्राध्यापकांनी प्रयत्न केले.
