उमरगा, औसा, तुळजापूर, कळंब व भुम येथे सभा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे धाराशिव लोकसभा मतदार संघात जनसंवाद यात्रा करणार असून या यात्रेत ते पाच ठिकाणी जनतेशी संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर प्रथमच ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार यात्रेचा शुभारंभ व धाराशिव मतदारसंघातील लोकसभेचा उमेदवार निश्चितीसाठी हा दौरा उपयुक्त ठरणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार व एक आमदार असल्याने दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे. उध्दव ठाकरे साहेब १६ फेब्रुवारी रोजी खाजगी विमानाने लातूर विमानतळावर येतील,
दुपारी १२.३० वाजता औसा येथे विजय मंगल कार्यालय, तुळजापूर मोड येथे सभा घेणार आहेत. त्यानंतर लामजना, किल्लारी मागें उमरगा असा प्रवास करणार आहेत. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता वाजता उमरगा येथे दत्त मंदिर समोर गुंजोटी कॉर्नर येथे सभा होणार आहे.
यानंतर तुळजापूर येथे सायंकाळी ७ वाजता डॉ. आंबेडकर चौक, तुळजापुर येथे सभा होणार. धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची पाच ठिकाणी होणार सभाआहे.
सभेनंतर शिंगोली व्हीआयपी शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम राहणार आहे. शनिवारची १७ फेब्रुवारी रोजी शिंगोली व्ही. आय. पी. गेस्ट हाऊस येवून आळणी फाटा, ढोकी मार्गे कळंबला जातील, कळंब येथील होळकर चौक येथे ११ वाजता सभा आहे.
कळंब येथून येरमाळा, बार्शी बायपास मार्गे परंडा कडे प्रवास करणार आहेत. परंडयाहून सोनारी येथे भैरवनाथचे दर्शन घेतील, त्यानंतर अनाळा, वालवड मार्गे भूमकडे प्रवास करणार आहेत. भूम येथे सायंकाळी ओंकार चौक, नगर पालीकच्या समोर सभा होणार आहे.
