महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्या 57 वाढदिवसाच्या निमित्ताने स्वरांजली गॅस एजन्सी पाथरूड यांच्या वतीने उज्वला योजनेअंतर्गत 57 गॅस कनेक्शन मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी जनसेवा बँकेचे व्हाईस चेअरमन जालिंदर तात्या मोहिते, जनसेवा बँकेचे चेअरमन श्रीराम मुळे, जिल्हा चिटणीस कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अंगद मुरूमकर, आदम शेख, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भूमनगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते रोहन जाधव, भारतीय जनता पार्टी तालुका कोषाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, भाजपचे वालवड ग्रामपंचायत सदस्य भारत पाटोळे, विविध कार्यकारी सोसायटी सदस्य रोहिदास भोसले, अमोल बसाड, गोकुळदास झोळ, महादेव नागरगोजे, हरिदास रामदास वेदपाठक,बाळासाहेब बोराडे, बालाजी नागरगोजे, अशोक गजरे सिद्धिविनायक गॅस एजन्सी व्यवस्थापक विशाल चिलगर, बंटी भोरे, व लाभार्थी महिला व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजवंत लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन मोफत मिळाल्यामुळे लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद जाणवत होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान बोराडे यांनी केले. तर आभार जनसेवा बँकेचे वरिष्ठ संचालक अंगद मुरूमकर यांनी मानले.
