महिलांनी क्रिकेट खेळून साजरा केला महिला दिन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी: येथील टर्फ गार्डन येथे रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, लायन्स क्लब तेजस्विनी व रोट्रॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने क्लबच्या माध्यमातून महिलांसाठी व मुलींसाठी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतला.
चारही क्लबने प्रथमच आयोजित केलेली बॉक्स क्रिकेट स्पर्धा प्रत्येक खेळाडू आणि क्लब सदस्यांसाठी अतिशय खास होती. या स्पर्धेमध्ये दोन्ही गटातून ५-५ संघांनी आपला सहभाग नोंदवला. सर्व खेळाडू व सदस्यांनी या स्पर्धेचा मनसोक्त आनंद लुटला. यामध्ये २१ वर्षावरील महिला व २१ वर्षाखालील मुलींसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
RILR महिला प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत महिलांच्या गटात कर्मवीर संघाच्या खेळाडूंनी व मुलींच्या गटात स्काय वॉरियर्स संघाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. महिलांची रेनबो वॉरियर्स व मुलींची हिट स्कॉड हे संघ उपविजेते ठरले.
तर महिलांमध्ये तृतीय क्रमांक बार्शी क्रिकेट क्लब व मुलींमध्ये एक्सर्जी वॉरियर्स व चतुर्थ क्रमांक महिलांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बार्शी यांना प्रधान करण्यात आले. त्याचप्रमाणे महिलांमध्ये स्पर्धे चे मालिका वीर-स्मिता कांकरिया, सर्वोत्कृष्ट फलंदाज-सुप्रिया वाळवी, सर्वोत्कृष्ट गोलंदाज-वैष्णवी घाडगे, सर्वोउत्कृष्ट क्षेत्ररक्षक-सॅम मदगुंडे हे ठरले तसेच मुलींमध्ये स्पर्धेचा मालिका वीर व सर्वोउत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रांजली पाटील, सर्वोत्कृष्ट फलंदाज समीक्षा यमले, सर्वोत्कृष्ट गोलंदाज नेहा काळे व अनुष्का आवटे यांनी केले.
संघांना बार्शी टेबल टेनिस अकॅडमी व अर्चना स्वामी यांच्याकडून ट्रॉफी प्रदान करून गौरवण्यात आले तर विजेता मुलींना डॉ. वर्षा शेळके व डॉ. वर्षा मोरे यांच्याकडून ट्रॉफी प्रदान करून गौरवण्यात आले. स्पर्धेसाठी अक्षय लष्कर यांचे फिनिक्स किक्रेट अकॅडमीच्या वतीने पंच व्यवस्थापन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन धनुर्विद्येतील नॅशनल खेळाडू रूपाली यमगर, कविता राऊत, उज्वला सोपल, निर्मला बारबोले यांच्या हस्ते करण्यात आले. तर बक्षीस समारंभासाठी अनिल बंडेवार हे उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष शैलेश वखारिया, इनरव्हील अध्यक्षा विनिता भानुशाली, तेजस्विनी अध्यक्षा अर्चना आवटे, रोटरॅक्ट अध्यक्ष गणेश स्वामी तसेच सर्व स्पॉन्सर उपस्थित होते.
या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रकल्पप्रमुख सोनाली कस्पटे, मयुरी बंडेवार, राधिका सोमानी, शिल्पा सरवदे, उषा सोमानी, डॉ वर्षा शेळके, अंकिता चांडक, अतुल कल्याणी, जयश्री ढगे, नवनाथ गुळणे तसेच सर्व क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले.
या सामन्यांचे प्रायोजक बार्शी टेबल टेनिस अकॅडमी तर सह प्रायोजक बंडेवार ट्रॅक्टर्स, वैभव पाठक, बागमार परिवार, महाराष्ट्र क्लासेस, स्तुती ग्रुप, श्री गणेश वस्त्र दालन, भीमाशंकर फार्मा, समर्थ स्पोर्ट्स, कॅफे वन टू का फोर, अभिजित डीडवळ, नक्षत्रा डेंटल क्लिनिक, वर्षा मोरे, वर्षा शेळके, आनंद बेदमुथा हे होते.
