आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

माझा निधी लिंगायत समाजाच्या विकासासाठी समर्पित

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, Social • March 13, 2024
Spread the love

खासदार डॉ अजित गोपछडे यांचे प्रतिपादन

भूम : माझा सहा वर्षाचा निधी लिंगायत समाजाच्या विकासासाठी समर्पित करत आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केले.

हाडोंग्री येथे आले असता लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते.
श्री क्षेत्र संत शिरोमणी मन्मथ स्वामी महादेव मंदिर येथे तपोभूमी शिवलिंग शिवकडा 423 व्या समाधी सोहळ्यानिमित्त खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.


लिंगायत समाजाचे विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मानुरकर, गुरू राचलिंग शिवाचार्य महाराज पंरडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

मन्मथ स्वामी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केली. ते म्हणाले, लिंगायत समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी मी महाराष्ट्र पिंजून काढत आहे. लिंगायत समाजाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याने समाजाचा विकास झालेला नाही आणि महाराष्ट्रातील सर्व लिंगायत समाजाने जात पोट जात विसरून एकत्रित येणे काळाची गरज आहे.

भाजप सोबत एकनिष्ठ कार्यकर्ता राहिल्याने मला राज्यसभेची खासदारकी मिळाली त्यामुळे सर्व लिंगायत समाजाने भाजपच्या आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी लिंगायत समाजाला केले.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, भुम नगरपलिकेचे नगराध्यक्ष संजय गाढवे, डॉ त्रिंबक स्वामी, मुक्ताप्पा तळेकर, अमेय पाटील, संजीवनी पाटील, अनिल तळेकर, भाजप तालुका अध्यक्ष महादेव वाडेकर. शंकर खामकर, संतोष सुपेकर, वाशीचे माजी नगराध्यक्ष शिंगनापुरे बाळासाहेब स्वामी, चंद्रकांत पाटील, उमाकांत स्वामी, शिवाजी तळेकर, सचिन भरणाळे, समाधान तळेकर, लक्ष्मण दांईगडे, महादेव मनगिरे, धनंजय शेटे, प्रवीन शेटे, आब्बास सय्यद, बाळासाहेब गवळी, चंद्रकांत गवळी, दीपक खराडे, डॉ. शिवशंकर खोले, सिद्धेश्वर मनगिरे यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकाश पवार यांनी केले.