महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी: जागतिक महिला दिन स्वयम उद्योजिका महिला सन्मान सोहळा दि.१५ मार्च रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन बार्शी तनिष्का तालुका अध्यक्ष अपर्णा शिराळ, बार्शी बिझनेस वुमन ग्रुपच्या दिपाली झालटे आणि शब्दरंग बार्शीच्या डॉ. वंदना यादव यांनी केले होते.
स्त्रियांचे एकत्रीकरण, मार्गदर्शन व सबलिकरण करण्यासाठी स्वयं उद्योजका महिला सन्मान आयोजित केला होता. महिलांनी लावलेल्या स्टाॅल्सला मोठा प्रतिसाद मिळाला. महिलांच्या संदर्भात शासकीय योजना कोणत्या असतात या बाबत माहिती देण्यात आली. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ आणि इतर साहित्य स्टॉल होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक अभय दिवाण आणि संभाजी घडगे होते. या समारंभाला सुनीता सुरवसे, उल्का डोंबे, वर्षा शिंदे, भाग्यश्री शेळके, शोभा घुटेपाटील, मयूरी पवार, प्रणाली जगताप उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शीतल कुलकर्णी यांनी केले. सर्व स्टॉल धारकांना सर्टिफिकेट आणि उपहार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी यामध्ये स्मिता लाड, दक्षा शहा, आमिरा तांबोळी, अर्चना घणाचार्य, सुवर्णा लिंबराज करडे, विमल संजय वाणी, पूनम अंधारे, सारिका ढगे, अर्चना काबरा, शकुंतला काळे, प्रिया गुगळे, रेशमा चेचे, सरोजिनी घोडके, साधना गणेश गोडसे, शलिनी गणेश शिंदे, प्रतीक्षा बेदमुथा, संध्या तासगांवकर, मोरे मावशी, पल्लवी मोरे, रुचा राहुल कुलकर्णी, जयश्री बाळासाहेब चाटे, गीता अजय फावडे, वर्षा रगडे, नीता दिवाकर हगरे, राजश्री लहू मुटेकर, दीपाली कापसे, शुभांगी योगेश रेवजे, विनया पाथरूडकर, राजुल कांकरीया, वंदना सुरेश जाधव, सिंधु दत्तात्रय रणशिंगे, स्मिता कुंभार, सूचित्रा गायली, नीता दसांगे, अनीता पाटील, सीमा दुधंनकर, रेखा पवार, सुनीता सुराणा, तेजस्विनी सुरवसे, सुषमा जाधव यांचे स्टॉल होते.
खरेदी विक्रीही उत्तम झाली. त्यावेळी अपर्णा शिराळ, दिपाली झालटे आणि डॉ. वंदना यादव मॅडम यांना आदर्श समाज सेविका म्हणून सन्मानित करण्यात आले.
