युनिट-५ गुन्हे शाखेची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : मोबाईल फोन व वाहन चोरी करणारा चोरटा जेरबंद करण्यात युनिट-५ गुन्हे शाखेला यश आले आहे. वैभव बिनवडे, (वय २० वर्षे, रा. सय्यदनगर, गल्ली नं. १६ मश्जिदच्या पाठीमागे, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याच्या कब्जातुन एकुण ८२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये एकुण ३ मोबाईल हन्डसेट व मोटार सायकल हे जप्त करण्यात आले. युनिट ५, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील तपास पथक हे युनिट कार्यक्षेत्रात हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत होते.
पोलीस अंमलदार विनोद शिवले व शशिकांत नाळे यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव बिनवडे याने हडपसर परिसरातुन मोबाईल चोऱ्या केल्या आहेत. चोरी केलेले मोबाईल फोन हे विक्री करण्यासाठी त्याच्याकडील नंबरप्लेट नसलेल्या हिरो स्प्लेंडर मोटार सायकलवरुन तो आकाशवाणी, हडपसर येथे येणार आहे.
त्याप्रमाणे युनिट कडील स्टाफने वरिष्ठांच्या आदेशाने तपास पथक हे आकाशवाणी, हडपसर येथे सापळा लावुन थांबले. थोड्याच वेळात पोलीस ओळखत असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव बिनवडे आल्याने त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले. आरोपी याच्याकडुन हडपसर व मुंढवा पोलीस स्टेशन कडील गुन्हे उघडकीस आलेले आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट – ५, गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, दया शेगर, प्रताप गायकवाड, अकबर शेख व पल्लवी मोरे यांनी केलेली आहे.
