चंदननगर पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपीस बेडया ठोकण्यास चंदननगर पोलीसांना यश आले आहे.
धीरज सपाटे, (रा. लेन नंबर १, तुकारामनगर, खराडी) याला अटक करण्यात आले आहे. दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यासाठी चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्या टीम तयार करुन गुन्हयातील १० आरोपींना केवळ २४ तासात अटक केले होते.
तसेच यातील आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासुन एका महिन्यापासुन फरार झाला होता. तो पिंपरी चिंचवड, धायरी, कोंढवा, अहमदनगर, बीड अशी वेगवेगळी ठिकाणे बदलुन अटक चुकवित होता.
यातील आरोपी धीरज सपाटे याचा शोध घेत असताना, तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना त्यांच्याविषयी माहिती मिळाली.
या माहितीप्रमाणे तपास पथकाची टीम पोहचली असताना त्याला पोलीसांची चाहुल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पोलीस स्टाफने पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याला पुढील कारवाईसाठी चंदननगर पोलीस स्टेशन येथे आणले असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ४ विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील, चंदननगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलिस स्टेशन तपास पथक पोलिस उपनिरीक्षक तान्हाजी शेगर, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, विष्णु गोने, महेश नाणेकर, सचिन रणदिवे शिवाजी धांडे, गणेश हांडगर, शेखर शिंदे, श्रीकात कोद्रे, सुरज जाधव, नामदेव गडदरे, विकास कदम, ज्ञानोबा लहाणे यांनी केली आहे.
