महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : केरळ राज्यातील कोची ( कोचीन ) येथे भारतातील सर्वात लांब ओपन वॉटर स्पर्धा ‘स्वीमथॉन’ या स्पर्धेमध्ये बार्शीच्या ७ जलतरणपटूनीं बाजी मारत बार्शीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
यामध्ये १६ किलोमीटर, १० किलोमीटर, ६ किलोमीटर, २ किलोमीटर अश्या वेगवेगळ्या वयोगटांमध्ये बार्शीतील कर्मवीर जलतरण तलाव संचलित फ्लिपर्स स्विम क्लबच्या विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमधील विजेते खेळाडू – माधव शिंदे १६ किलोमीटर (वय 12), क्रांती मोरे १६ किलोमीटर (वय19), शौर्य नवले १० किलोमीटर (वय 9), तनवी नवले १० किलोमीटर (वय 8), स्निग्धा जगताप ६ किलोमीटर (8 वय), शुभ्रा कडगंजी ६ किलोमीटर (वय 8), ईश्वरी महाडिक २ किलोमीटर (8 वय) सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सर्व मुले वयाने लहान होती.
या सर्व मुलांना बाळराजे पिंगळे, सुंदर लोमटे, व्यवस्थापक कर्मवीर जलतरण या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
