युनिट ५, गुन्हे शाखेची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : सलग १२ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस बारडोली, गुजरात येथुन अटक करण्यात युनिट ५, गुन्हे शाखेला यश आले आहे.
वहीम पटेल, (वय ४५ वर्षे रा. अस्थान जीम कंपाऊंड, मॅजीक ग्लास शॉप ता. बारडोली जि. सुरत राज्य गुजरात व मुळ स.नं. ११०, रामटेकडी, हडपसर, पुणे याला गुजरात राज्य, बारडोली) याला ताब्यात घेण्यात आले आहे. युनिट ५ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी युनिटकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या वेगवेगळया टिम तयार केल्या.
त्यानुसार युनिट ५ कार्यक्षेत्रातील पोलीस फरारी आरोपीचा शोध घेत असताना वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असणाऱ्या वहीम पटेल, याचे न्यायालयाने वॉरंट काढुन सुध्दा तो मिळुन येत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याचा जाहिरनामा प्रसिध्द केलेला आहे.
फरारी आरोपीबाबत पोलीस अंमलदार राजस शेख यांना माहिती मिळाली की, फरार आरोपी वहिम पटेल हा स्वतःचे नाव बदलुन तो बारडोली, गुजराज राज्य येथे राहत आहे. तसेच त्याचा तेरा वर्षापुर्वीचा फोटो प्राप्त झाला. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ युनिट-५ कडील एक तपास टिम बारडोली, गुजरात राज्य येथे पाठवली. तपास टीमने बारडोली येथे त्याचा शोध घेतला.
पोलीसांकडे त्याचा सुमारे तेरा वर्षापुर्वीचा फोटो असल्याने त्याची ओळख पटविणे अवघड होते. तरीदेखील पोलीसांनी त्यास शिताफीने पकडण्यासाठी शिस्तबध्द नियोजन केले. त्यानुसार फरार आरोपी नामे रहिम उर्फ वहिम पटेल याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे तपास केला असता तो १२ वर्षापासुन पोलीसांच्या अटकेला घाबरुन वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे नाव बदलुन राहत असल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वानवडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, प्रमोद टिळेकर, दया शेगर, पृथ्वीराज पांडुळे, पांडुरंग कांबळे यांनी केलेली आहे.
