• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 23, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे लोकसभा निकाल दुपारी अडीचपर्यंत

June 1, 2024
0
1 6 24 3
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे : ४५ दिवस डाटा सुरक्षित, मतमोजणीसाठी १८९६ अधिकारी, २१ होणार फेऱ्या

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : “मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांकडून ४५ दिवसांच्या आत आक्षेप आल्यास आक्षेप आल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतांची पुनःमोजणी करण्यात येते; मात्र आक्षेप न आल्यास इव्हीएममधील सर्व डेटा नष्ट करण्यात येईल. ४ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता इव्हीएममधील मतांची मोजणी करण्यास सुरुवात होईल.

पहिल्या फेरीला साधारण अर्ध्या तासाचा वेळ लागणार असून, चारही जिल्ह्यांतील मतदारसंघांचा विचार करता दुपारी अडीचपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल,” अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते”मतदानाच्या दिवशी संपूर्ण मतदान झाल्यानंतर उमेदवारांच्या प्रतिनिधींना देण्यात आलेल्या ‘१७ सी’ या अर्जात एकूण मतदानाची आकडेवारी देण्यात आली आहे.

मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्षमोजलेली मते या ‘१७ सी’ मधील आकडेवारीशी जुळवली जाते. त्यात तफावत आढळल्यास संबंधित मतदान केंद्राध्यक्षाकडील डायरीतील आकडेवारीशी पुन्हा जुळवणी केली जाते.

ती न जुळल्यास व्हीव्हीपॅटमधील मतदान चिठ्ठयांची पुन्हा एकदा जुळवणी केली जाते. मतमोजणीनंतर पाच व्हीव्हीपॅटमधील मतदान चिठ्ठयांचीही मोजणी केली जाते. उमेदवारांना यासंदर्भात शंका असल्यास निरीक्षकांसमोर पुन्हा मतमोजणी केली जाते.

त्यानंतर हे सर्व इव्हीएम, व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिट सीलबंद करून गोदामांमध्ये साठविले जाते.” मतमोजणीची प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. सुरुवातीला टपाली मतदान मोजण्यात येणार आहे.

त्यानंतर साडेआठ वाजता इव्हीएममधील मतांची मोजणी करण्यास सुरुवात होईल. पहिल्या फेरीला साधारणअर्ध्या तासाचा वेळ लागणार असून, चारही जिल्ह्यांतील मतदारसंघांचा विचार करता दुपारी अडीचपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल, अशी आशा आहे.

टपाली मतमोजणी साधारण साडेबारा वाजेपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे; मात्र नियमानुसार या मतांची मोजणी शेवटच्या फेरीपूर्वी होणे अपेक्षित आहे. शेवटच्या फेरीतील मतांमध्ये ही मते मिळवली जातात, त्यानंतर अंतिम मते घोषित करण्यात येतात.

टपाली मतमोजणीसाठी १७४ अधिकारी व कर्मचारी तर इव्हीएम मतमोजणीसाठी १८९६ अधिकारी, कर्मचारी नियुक्त केल्याचे दिवसे यांनी यावेळी सांगितले. मतमोजणीच्या२१ होणार फेऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघासाठी २०१८ मतदान केंद्र होते.

त्यानुसार सहा विधानसभा मतदारसंघांसाठी १०२ टेबल लावण्यात आले आहेत. त्यामुळे मतमोजणीच्या २१ फेऱ्या होणार आहेत, बारामतीसाठी २५१६ मतदान केंद्र होते. त्यामुळे ११४ टेबलांची आवश्यकता आहे. या मतदारसंघात २४ फेऱ्या होणार आहेत. शिरूरमधील २५०९ मतदान केंद्रांसाठी १०० टेबल लावले आहेत. टेबलांची संख्या कमी असल्याने मतमोजणीच्या २८ फेऱ्या होणार आहेत.

1 6 24 3 1
Download

Latest Articles

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

April 23, 2026

अप्पा बळवंत चौकात थरार PMPML दुकानात घुसली!

April 23, 2026
सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

April 22, 2026
तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

April 22, 2026
Load More
Previous Post

अक्षय बावस्कर यांची औषध निरीक्षक पदावर नियुक्ती

Next Post

हाडोंग्रीच्या भगवंत विद्यालयाचा दहावीचा निकाल 88 टक्के

Recent News

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

April 23, 2026
सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

April 22, 2026
तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

April 22, 2026
मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

April 23, 2026

अप्पा बळवंत चौकात थरार PMPML दुकानात घुसली!

April 23, 2026
सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

April 22, 2026
तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

April 22, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

April 23, 2026

अप्पा बळवंत चौकात थरार PMPML दुकानात घुसली!

April 23, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta