भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी टेम्पो चोरणाऱ्या आरोपीस अटक करून त्याच्याकडील दहा लाख रुपये किमतीचा टेम्पोही जप्त केला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे चोरीच्या गुन्हयांतील आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेट्रोलींग करीत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे यांना गायमुख चौक, आंबेगाव बु, पुणे येथे एक जण अशोक लेलंड कंपनीचा टॅम्पो घेवुन थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गायमुख चौक, आंबेगाव बु, पुणे येथे जावून तेथुन संदीप संजय काळवणे (वय ३४, रा.फ्लॅट नंबर १०८, सदगुरु बी/१ दळवीनगर, आंबेगाव बु, पुणे, मुळ गाव मु.पो शिरनाळ, ता.चाकुर, जि. लातुर) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील १० लाख रुपये किंमतीचा अशोक लेलंन्ड कंपनीचा चारचाकी टॅम्पो (MH12VF1004) जप्त करुन त्यास अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, प्रविण पवार सह आयुक्त. प्रविणकुमार पाटील अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, स्मार्तना पाटील. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, नंदीनी यग्बाणी सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अवद्युत जमदाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, नामदेव रेणुसे, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, हर्षल शिंदे, धनाजी पोत्रे, सचिन गाडे, विक्रम सावंत, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली आहे.
