वृक्ष संवर्धन समितीतर्फे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
बार्शी : झाडांना फुगे लावून एका विशिष्ट पद्धतीने जागतिक पर्यावरण दिन व वृक्ष संवर्धन समितीचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मेजर दत्तात्रय मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी आत्तापर्यंत वीस हजार झाडांची लागवड करून त्याचे विशिष्ट पद्धतीने संगोपन केल्याचे सांगितले. युद्धात शहीद झालेल्या व या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व कुटुंबाचा वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मधुकर डोईफोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी वृक्ष लागवडी बरोबरच प्रदूषण यावर कसे नियंत्रण ठेवावे याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. उदयकुमार पोतदार यांनी सर्वाना वृक्ष संदर्भातील शपथ दिली.
या कार्यक्रमासाठी बार्शीतील विविध शाळेतील विद्यार्थी, डॉक्टर्स तसेच हेल्थ क्लबचे सर्व सदस्य पोलिस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी सदस्य, हॅपी क्लब चे सर्व सदस्य, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शाळेतील विद्यार्थी, तसेच शहीद कुटुंब मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्वांनी वृक्ष संवर्धन समितीच्या कामाचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
