सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये ठेकेदारावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : इमारतीचे बांधकाम चालू असताना चवथ्या मजल्यावरून पडल्याने एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे, तर एक जखमी झाला आहे.
धायरीतील चिंतामण रायकर यांच्या सदभावना बिल्डर यांच्या सर्व्हे नं. १०५ येथील लक्ष्मी सदन पुणे येथील साईट वर बांधकाम सुरु असताना ही दुर्घटना घडली. इमारतीचे प्लास्टर काम सुरु असतांना बांधलेला पहाड कोसळला.
त्यामुळे दोन जन खाली पडले. त्यात या मुलीचा डोक्यास जबर मार लागुन (वर १७, रा. सुदंर आंगण सोसायटी पोकळेवस्ती धायरी) मृत्यू झाला. तर ठेकेदार मुबारक जमादार, (रा. स्वामी स्पर्श गारमाळ, धायरी, पुणे) हा जखमी झाला आहे.
बांधकाम चालु असलेल्या साईटवरील, मजुर कामगारांकडुन काम करवुन घेत असताना त्याचे जिवीताचे संरक्षणाचे दृष्टीने सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, तसेच बांधकामाचे टप्यानुसार संरक्षक जाळी लावणे आवश्यक असताना सुविधा न पुरवल्याने ही दुर्घटना घडली आहे.
सिंहगड पोलीस ठाण्यात ठेकेदार मुबारक जमादार (रा. स्वामी स्पर्श गारमाळ, धायरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती. पोलीस उप निरीक्षक श्रीकांत सावंत यांनी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क शी बोलताना दिली.
