महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : महाराष्ट्रातील पोलिस दलात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या ४४९ सहायक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर व ग्रामीणच्या १८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी सोमवारी याबाबतचा आदेश काढला. पदोन्नती मिळाल्याने त्यांची आता नवीन ठिकाणी बदलीही झाली आहे.
सोलापूर शहर व ग्रामीण पोलिस दलातील बढती झालेल्या पुढील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (कंसात आताचे ठिकाण व बदलीचे नवीन ठिकाण)
प्रमोद नलावडे (सोलापूर ग्रामीण – पुणे गुन्हे अन्वेषण विभाग), इंद्रजीत वर्धन (सोलापूर शहर – छत्रपती संभाजीनगर पोलिस प्रशिक्षण केंद्र लातूर), बाळासाहेब माने (सोलापूर ग्रामीण – पुणे गुन्हे अन्वेषण विभाग), महेश भावीकट्टी (सोलापूर ग्रामीण – लोहमार्ग पुणे), रईसा शेख (सोलापूर शहर – सोलापूर), विनायक देवकर (सोलापूर ग्रामीण-नाशिक पोलिस प्रशिक्षण केंद्र धुळे), शारदा वालकोळी (सोलापूर शहर-मुंबई शहर लोहमार्ग मुंबई), भगवान नाईकवाडे (सोलापूर ग्रामीण-मुंबई शहर), नारायण मिसाळ (सोलापूर ग्रामीण- मुंबई शहर), बाबासाहेब काकडे (सोलापूर ग्रामीण-मुंबई शहर) विनोद चव्हाण (सोलापूर शहर – गडचिरोली), यशवंत बारवकर (सोलापूर शहर-मुंबई शहर), सचिन बनसावडे (सोलापूर शहर – मुंबई शहर) रवींद्र मांजरे (सोलापूर शहर – मुंबई शहर), नितीन थेटे (सोलापूर ग्रामीण – मुंबई शहर), स्वप्निल इज्जपवार (सोलापूर ग्रामीण – गडचिरोली), बापू पिंगळे (सोलापूर ग्रामीण-मुंबई शहर), सचिन बडगर (सोलापूर शहर- मुंबई शहर) या १८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
