मुंढवा पोलीसांनी तासाच्या आत आरोपीस केले जेरबंद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री पिण्यास पाणी मागीतल्याने झालेल्या वादातून तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले. मुंढवा पोलिसांनी अवघ्या तासाभरात आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि. ०८ जून रोजी रात्री मुंढवा मार्शल वरील कर्मचारी यांना आनंद निवास, कामगार मैदान जवळ, अर्धवट बांधकाम चालु असलेल्या घरामध्ये एक इसम जखमी आवस्थेत पडला असल्याचा कॉल नियंत्रण कक्ष येथुन प्राप्त झाला.
सदर कॉल प्राप्त होताच मुंढवा पोलीस स्टेशन कडील रात्रगस्त अधिकारी व अंमलदार हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमी इसमाची महिती घेण्यास सुरवात केली असता जखमी इसमाचा भाऊ संतोष निवृत्ती अल्हाट यांनी जखमी हा त्याचा भाऊ असुन त्याचे नाव श्रीकांत निवृत्ती अल्हाट (वय ४२ वर्षे, असे असल्याचे पोलीसांना सांगितले.
पोलीसांनी तात्काळ जखमी इसमास अॅब्युलन्सने पुढील औषध उपचारसाठी ससुन हॉस्पीटल येथे घेवुन आले परंतू श्रीकांत अल्हाट हा उपचार पुर्वी मयत झाल्याचे ससुन हॉस्पीटल डॉक्टरांनी घोषीत केले होते. सदर प्रकाराबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना माहिती मिळताच त्यांनी तपास सुरु केला.
गुप्तबातमीदारा मार्फत माहिती प्राप्त करुन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपास दरम्यान श्रीकांत निवृत्ती अल्हाट हा दि. ९रोजी रात्री १०.३० वा.चे सुमारास मयत श्रीकांत हा त्याचा मामे भाऊ राकेश तुकाराम गायकवाड याचे कडे पाणी मागण्यासाठी गेला असता त्यावेळी राकेश व श्रीकांत यांच्या मध्ये वादीवाद होवुन भांडणे सुरु झाली.
त्याच भांडणामध्ये राकेश गायकवाड यांनी श्रीकांत अल्हाट यास सिमेंटच्या दगडाने व विटेने व लोखंडी गजाने मारले अशी माहिती मिळाली. भाऊ संतोष निवृत्ती अल्हाट याने त्याचा मामे भाऊ राकेश तुकाराम गायकवाड याचे विरुध्द खुनाची तक्रार दिल्याने मुंढवा पोलीस स्टेशन येथे खुनाचागुन्हा दाखल झाला.
मुंढवा पोलीस स्टेशन कडील एकुण ३ पथके व तपास पथक मधील अधिकारी व अंमलदार यांनी १ तासाच्या आत गुन्हयातील नामे राकेश तुकाराम गायकवाड याचे मुसक्या आवळुन त्यास जेरबंद केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, अमितेश कुमार. पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, प्रविण पाटील, पोलीस उप आयुक्त, आर राजा पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त, अश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक संजय माळी, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक अनिल बिनवडे, पोलीस उपनिरीक्षक उप निरीक्षक निरीक्षक महादेव लिंगे, शुभांगी मगदुम, संतोष जगताप, प. तुळशीराम तुळशीराम रासकर, रासकर, दिनेश भांदुर्गे, राजु कदम, दत्ताराम जाधव, रविंद्र देवढे, योगेश गायकवाड, जगदिश महानोर, किरण बनसोडे, राहुल मोरे, सचिन पाटिल, स्वनिल रासकर, निलेश पालवे, दयानंद गायकवाड, यांनी केली आहे.
